महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ३० ते ३३

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


भगवत्पूज्यपादाश्च शुष्कतर्कपटूनमून् ॥
आहुर्माध्यामिकान् भ्रांतानचिंत्यऽस्मिन्सदात्मनि ॥३०॥

सद्दस्तुचे ठाईं ॥ विपरीत कल्पिती  जे कांहीं ॥
तया भ्रांताचें नांवही ॥ घेऊं नये ॥१३८॥
ते आपणचि ना बुडती ॥ इतरांसी घेती सांगाती ॥
म्हणोनी आचार्य दूषीती ॥ तया लागीं ॥१३९॥

अनाद्दत्य श्रुतिं मौर्ख्यात्तदिमे बौद्धास्तमस्विन: ॥
आपेदिरे निरात्मत्वमनुमानैकचक्षुष: ॥३१॥

माध्यामिक बौद्धादिक ॥ श्रुती अनादरुनी मूर्ख ॥
इंद्रियें अनुमानिती देख ॥ निरात्मत्व ॥१३०॥
म्हणती शून्थच पूर्वीं होतें ॥ तया पासुनी हीं पंच महाभूतें ॥
सृष्टी झाले निर्मिते ॥ संयोग बळें ॥१४१॥
प्रलय होतां अंतीं ॥ शून्यची सकल होती ॥
पुन्हा तेथोनीच उद्भवती ॥ आपोआप ॥१४२॥
एवं आदी आणि अंतीं ॥ शून्यचि आहे निश्चिती ॥
ऐसें जे का बोलती ॥ तया दूषती ॥१४३॥

शून्यमासीदिति ब्रूषे सद्योगं वा सदात्मताम् ॥
शून्यस्य न तु तद्युक्तमुभयं व्याहतत्वत: ॥३२॥
न युक्तस्तमसा सूर्यो नापिचासौ तमोमय: ॥
सच्छून्ययोर्विरोधित्वाच्छून्यमासीत्कथं वद ॥३३॥

तूं पूर्वीं शून्य होतें ऐसें बोलसी ॥ तरी तया कोण सत्ता लाविसी ॥
कां तेंचि स्वत: विराजसी ॥ सद्रूपत्वें ॥१४४॥
दोन्ही ही तुझ्या पक्षीं ॥ सतचि लाविसी साक्षी ॥
परिहे विरुद्ध पणा लक्षी ॥ हेंही तुज नकळे ॥१४५॥
सूर्य आंधारें झाला युक्त ॥ किंवा तमोमयचि निश्चित ॥
हे दोन्ही बोल भ्रांत ॥ जियापरी ॥१४६॥
तैसें शून्य विरोधी असतां ॥ कैसी लाविसी सद्रूप सत्ता ॥
सरूपचि शून्य म्हणतां ॥ शून्यता कैसी ॥१४७॥
शून्याशीं शून्य कोणी म्हणावें ॥ शून्येची शून्या कैसें प्रकाशावें ॥
नामरूपातें भावावें ॥ कवणें कवणा ॥१४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP