तुटलेले दुवे - मुग्धे, तू तर चाललीस, ऊकड...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
मुग्धे, तू तर चाललीस, ऊकडे मी राहिलों ऐकला.
प्रेमाचा नुसता न शब्द, कुठलें तें चुम्बनालिङगन,
ऊष्णोच्छवास, परास्पराश्रु करणें वक्षावरी सिञ्चन ?
द्दष्टाद्दष्टहि होऊना सरस तू माझी जरी चिक्तला.
जाशी स्वामिनि शारदे, तुजविना हा रुद्रवीणा मुका;
तू माझी मधुदेवता, तुजविना हेमन्त चोहीकडे;
जातां तू अनुकूल वायुलहरी ही नाव होहीं अडे;
जातां जीवनमोहिनी रण बने हा जन्म वाया फुका,
हा निश्शब्द निरोप मात्र मजला होऊ महाजाचक,
जाशी तू तर दूर दूर पुढल्या नादामधे गुङगत.
नाही मींच कळूं दिलें तुज कधी माझें जुनें हृद्नत,
कां : त्याची अवहेलनाच वहुश: जो प्रीतिचा याचक.
तत्रापि स्मित नित्य मोहक तुझें - मी काय जाणूं जगीं ?
माझे अमृत गुप्त राहि हृदयीं गे वारि जेवी ढगीं.
१८ मे १९१५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP