तुटलेले दुवे - तू पद्मापरि फुल्ल चारु दि...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तू पद्मापरि फुल्ल चारु दिसशी, पद्माच किंवा ऊषा !
हर्षाची प्रतिमाच का तव मुखीं ही ऊच्च विद्याद्युती !
आशी कान्ति बघूनि पार हरपे कामी जिवाची तृषा,
दावी भोङगळ शालु हा खुळवुनी त्वद्रम्य ऊच्चाकृती,
ही मूर्ती न तुझी छबीच, नुसती छाया तरी ऐकच !
शेजारीं दिसतात. भव्य गुरु हे - हेही किती सुन्दर !
हंसश्वेत दुभङगले वर शिरीं हेलावणारे कच,
पाणीदार अथाङग नेत्र जणु की गम्भीर नीलाम्बर.
अन हे ? मित्रच हा - किती बदलला श्रीकान्त वाचस्पती,
शोभे ऊन्च किती अनङगपुतळा हा राजबिण्डा पहा.
का तो कार्तिक हाच ज्याप्रत तिरस्कार्य स्त्रिया वाटती ?
आधी सुन्दर, अन विशेष खुलतो पाश्वात्य वेषांत हा.
आहे ठाऊक काय गे तुज कित्टी मित्रास या चाहतों ?
मी डोळे भरुनी पुन: पुनरपी चित्राकडे पाहतों.
१७ ऑक्टोबर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP