तुटलेले दुवे - दारीं येऊनि ती म्हणे, “मज...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
दारीं येऊनि ती म्हणे, “मज करा झाल्या चुकीची क्षमा;”
दारीं धावुनि मी म्हणें, “चल सखे, ये, आंत ये या गृहीं !
चित्तद्रावक आणखी फिकट हा अद्यापि कां चन्द्रमा ?
गेला राहु पळूनि गेऊनि सवें ती सौख्यहारी दुही.”
स्फुन्दस्फुन्दुनि ती रडे, तिज रडे तें आवरेना मुळी,
येऊना जवळी म्हणूनि मग मी गेलों तिच्या सन्निध:
पोटाशीं धरिलें तिला म्हणत की, “ही काय शङका खुळी ?”
मागे सारुनि केस मीं वठविली लाली मुखीं चुम्बित.
आला धीर हळू हळू, मजवरी पुष्पाङग टाकूनिया
झाली ती स्थिर, भेटले क्षणभरी डोळ्यांस डोळे तशी
“जाऊं द्या मजला ऊथूनि” भिऊनी ऊद्नारली मप्रिया,
“जातें मी अपुली -” परन्तु सुटते वेङगेंतुनी ती कशी ?
लागे चाहुल, तों तशीच कुठली तोडूनिया वेङग ती -
अन मी जागृत होऊनी वर बघें तों माड ते पेङगती,
१९ सप्टेम्बर १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP