तुटलेले दुवे - प्रीती शुद्ध असूनि मङगल न...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
प्रीती शुद्ध असूनि मङगल न कां या भावनेला गती ?
एकामागुनि एक मीं करमिले आशेवरी वत्सर
की होऊल अखेर शून्य अमुच्या दोघांतलें अन्तर;
होती आस खुळीच, आणि य़ुवती अत्यत्न बेलाग ती,
माझे नेत्र तिच्याकडे तर तिचे अन्याकडे लागती,
माझा मित्रच तो तथापि हृदयीं पेटेच तो मत्सर, -
मी माणूस, गळेल रक्त न कसें लागे जरी नस्तर ?
वाटे गाढ विषाद त्यांतुनि जगे प्रीती जुनी जागती.
तो धन्य प्रणयी ! सुखांत बहरो त्याची तरी बाग ती !
आशीर्वाद असा दिला परि बघे प्रारब्ध तें वाकडें.
जीवांची मिळणीन त्यास बघवे. हेवा जिव्हारीं जडे,
अन पाडी प्रणयास राख करुनी भूमीवरी आग ती.
अन आम्ही विरहांत शोक करितों दोघेहि दोन्हीकडे
दावूं गूढ सहानुभूति कशि मी ? सन्देहडोहीं पडे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP