तुटलेले दुवे - द्दष्टीला निशिन्धहार पडता...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
द्दष्टीला निशिगन्धहार पडतां तूं ओढिला तो बळें;
वक्षाशीं धरिलास हुङगत किती गे घ्यान तैं शोभलें.
औत्सुक्यें पुशिलेंस हासत, “कुठे हा लाटिला आपण ?
होतें तें तर काव्यगायन ? अता सारेंच साङगा पण”.
आधी गाङगरलों कसा, परि पुढे केला कसा धीर मी,
काव्यौघांत कसा मला विसरलों जों सोडिलें तीर मीं,
श्रोत्यांच्याहि सहानुभूतिपवने पैलाड नेलें कसें -
ऐकूनी तव लोचनीं चमक ये, ये कौतुकाचें हसें,
आता कोण घरास मी परततां ? आता न काव्य स्फुरे.
स्कन्धीं कर्कशराजकारण पडे, स्वारस्य काही नुरे,
झाली गार सभा, विपक्ष हरुनी होऊनि गेला श्रमी,
गेले ठेवुनि लोक हारगजरे - यांचें करूं काय मी ?
अम्बाडयास तुवां स्वतांच करुनी वेणी तदा घातली,
घालीं मीच अता छबीस तुझिया ही पुष्पहारावली.
३ डिसेंबर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP