अप्रकाशित कविता - एक शोकपर्यवसायी नाटक

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[दिण्डि वृत्त]

प्रेमवेडा निर्जनीं वनीं जाई,
सुरङगीच्या पुष्यास तिथे पाही;
त्यजी चम्पक, मोगरा, जुऊ, गुलाब,
परी झाला त्याजला महालाभ. १

शान्त, उत्सुक तो जाय फुलापाशी,
म्हणे : “ठेविन तुज प्रीतिकेशपाशीं;
अथुनि नेऊं मी काय तुला ? बोल,
मोल देऊन तुज जीव हा अमोल.” २

“अरे, अच्छिसि तू स्नान मृगजलांत,
सुरुचि मधुची जो गगनिंच्या फुलांत,
गान तरत्या गन्धर्वमन्दिरांत,”३

असें उत्तर फूल तें हंसुनि देऊ.
वदे, “स्थिर मी या स्वतन्त्रता गेहीं;
अच्च आध्यात्मिक गन्धमय विचार
अडति, पृथिवीचा होत कधि विकार.” ४

वायु आला तों - काय करी खेळ ?
फुला व्हाया च्युत लागला न वेळ;
झुकुनि ओल्या अस्थिंच्या ढिगामाजी
पडे; पडतांही दिसे क्षणिक राजी. ५

जात असतां वेगांत अवनतीला.
मोद त्याच्या हो विलक्षण मतीला;
करी चपलातुल्य तें स्मित - विझालें !-
हाय मातीमोल तें अता झालें ! ६

प्रेमवेडा बघुनि हें स्तब्ध झाला,
थेम्बहि न ये अश्रुचा लोचनाला;
काल थोडा परतल्यावर असासा
टाकुनी तो परतला निज निवासा. ७

१ जुलै १९१६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP