अप्रकाशित कविता - अभङग

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


झोपल्या झोपडया
भोती अन्धारांत,
चोहींकडे रात
कशी शान्त. १

परन्तु दिवसां
वाचिली जी वार्ता
तिणें ही शोकार्ता
वृत्ति माझी. २

दूर गोकुळाला
दुष्ट लावी आग
मला तिची धग
जागा ठेवी. ३

घरीं तेथे कोण्डे
तापलेला धूर
नि मी येथे दूर
गुदमरें, ४

कसा हो झोपला
गोकुळींचा कान्हा,
द्वारकेचा राणा
योगेश्वर ? ५

वत्सांनो, त्या डोम्बीं
लागे काळ - झोप.
भवचिन्तालोप
झणीं होऊ ! ६

खडबडूनीया
का हो जागती न
गोप निद्राधीन
कोटयवधि ? ७

२५ एप्रिल १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP