अप्रकाशित कविता - वाटे तुझ्यापाशी धावतच जावें
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वाटे तुझ्यापाशी धावतच जावें डोकें खुपसावें कुशीमध्ये
रडून करावा जीवींच्या या भार हलका साचार थोडा तरी
दुखण्यांत धावे पुन्हा बाल्याकडे हें वेडेंवाकडें मत माझें
गोञ्जारूं दे मला माऊलीचा हात सञ्जीवनी त्यांत साठविली
तुझ्या द्दष्टीपुढे न ठरे अद्दष्ट, करावया कष्ट पाठव तू
काय करूं साङग जेणें पर्यायाने डोळ्यांचें पारणें तुझ्या फिटॆ
१७ ऑक्टोबर १९३९
Last Updated : November 11, 2016

TOP