प्रसंग दहावा - प्रसंग प्रशस्‍ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमोजी भाव भक्ति अक्षर ओळी । चरणबंध कवित्‍व प्रभावळी । नित्‍य निजानंद अक्षरें सोंवळीं । समाधान पावोनियां ॥१॥
अहो जी धीर निष्‍कलंक सद्‌गुरु । पुरता परिसोनि माझा विचारु । मज सनाथ करुनी वेरझारु । चुकवावी माझी ॥२॥
माझेंनि मुखें माझी भव यातना । ऐका जी सद्‌गुरु निजलोचना । तेणें तुमचिया समाधाना । निपजेल माया ॥३॥
रंकास जालिया जुलुम जांचणी । ते आड पडावया धांवे दिवाणीं । तैसा माझा सोस तुमच्या चरणीं । चित्त मनसेंसी एकाग्र ॥४॥
तंव सद्‌गुरूस आली महा करुणा । शम सम अवलोकी उदार राणा । शेख महंमद सांगे भवयातना । ते परियेसा स्‍वामी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP