प्रसंग दहावा - गर्भवास

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


भूक भक्षी जठराग्‍नि आहार पाक । रुधिर उपजोनि होये थुंक । बावन रसासीं होय साक । बहात्तर कृपिया झरती ॥७२॥
सहस्र थेंब अशुद्धाचे मुरोनी । मदन होये एक एक रति जमोनि । चढे श्रीहाट गोल्‍हाट भेदुनी । शेंबुड थुंका मळी निघे ॥७३॥
ब्रह्म आज्ञ ब्रह्मरंध्री झरा । मदन रति निपजे अवधारा । चाले ब्रह्मांड शिखर त्रिकुट धरा । चिपडी मळी झरे ॥७४॥
अर्धमातृकेचेनि समरसें । पित्‍याच्या नळें मेरूहूनि खसे । मातेच्या गर्भकमळीं पैसे । ॠतुकाळाचे समयीं ॥७५॥
वीर्यें विटाळ आपामध्यें आप । तेथें मज न कळे पुण्य पाप । पुढें आतां दुःखें देखणें अमूप । तीं ऐकावीं श्रोती प्रश्र्निकीं ॥७६॥
मळ मुत्र दथराचें जठरीं आळे । शुकलित श्रोणितासंगें रुळे । जीव नाद बिंद कळवळे । मुसमुसेमाझारी ॥७७॥
रज तेज सप्त धातूंसी अंकुर । जठराग्‍नि फुटती साचार । निजतत्त्वें सोऽहं ध्यानाचा उच्चार । करितसे दुःखें ॥७८॥
जठरीं कृमीं जंतु विष्‍टा मळ मुत्र । जारें गुंडाळलों दुर्गंधीचा उबार । जननी हाले चाले दुखवे अपार । गर्भाचे खोळेमाजी ॥७९॥
आवडे डोहोळे होती मातेस । ती भक्षे तिखट आंबट घांस । तंव चरक बसती उमज होय उदास । तें दुःख माता नेणें कांहीं ॥८०॥
माझी क्षुधा मागे आहारास । ईश्र्वरसत्तेनें नाळे वोतती रस । सांडणें होतां होय कासाविस । उदरीं उदर फुगों लागे ॥८१॥
जेव्हां पीडाकारें जननी दुःखी । तेव्हां मी तीहूनि अति शोकी । तों तों ते पीडाकारें डोळे रोखी । करी लल्‍लाट पिटोनियां ॥८२॥
गर्भी वर कुंडी अधोमुखी भासे । नरकवास भोगी अधोर्ध्व श्र्वासें । गात्रें सांधे मिळोनि वाढत असे । विष्‍टेच्या उबाळ्यामध्यें ॥८३॥
गर्भ गर्भात नाहीं उजेड वारा । त्‍वचेविण देहो होतसे उबारा । कोंडोन ऐशा यातना सर्वेश्र्वरा । कठीण कंठीतसे ॥८४॥
सहस्र हजार वरुषांचें ज्ञान । गर्भी ईश्र्वरें दिधलें मजलागुन । पूर्व जन्म आठवितां पोळे प्राण । त्राहे त्राहे देवा म्‍हणतसे ॥८५॥
तेथून मज काढी गा सद्‌गुरु । अखंड करीन तुझा सोऽहं उच्चारू । मागुता नको हा गर्भ घोरांदरु । जन्ममरणाचा मज ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP