प्रसंग दहावा - प्रारब्धभोग
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
अठरा भार वनस्थळी जिणें । उत्तम मध्यम कनिष्ठपणें । ऐसा चहूं खाणीं अविचारपणें । भ्रमण करित असे ॥५५॥
प्रारब्धें होय वनीचें हरण । पारधी श्र्वानें वधिती मजलागुन । अंगभूतें पळती जीव येऊन । सख्यत्व सांडूनियां ॥५६॥
या प्रालब्धें मच्छदेहीं अवतरे । वरुनी ढिकिती पागिरे । माझा व्याप गंवसे स्थूळाकारें । मजहि देखील ॥५७॥
प्रालब्धें होय बोका पाल सर्प। आपुलीं पिलं भक्षून करी पाप । तेंहि पालटल्या स्थूळरूप । अनेक देह धरी ॥५८॥
सहस्र वरुषें जन्म झाडा । त्यामाजी अनेक जन्म देखे पवाडा । दुःखी दुखवोनि होतसे वेडा । अंतरीं बहिजकारें ॥५९॥
होय दो तिसा वरुषांची गणती । भीतरीं कुहिजल्या ढोल म्हणती । त्यामाजी अनेक जीव मरती । उत्पन्न होऊनियां ॥६०॥
वृक्षपणें तुटोनि उमळे । एकीकडें पल्लवेंसी फळें । ऐसें सहस्र वर्षाचें भेंडोळें । उगवें एकाच देहीं ॥६१॥
प्रालब्धें होय कुकडा कुकडी । माझी अंडीं लोक भक्षिती आवडी । मजहि मुर्गाळूनि पंख उपडी । ऐसीं दुःखें संसाराचीं ॥६२॥
सर्पास आयुष्य वर्षें कोडी । परतोनि देह धरी कल्पना वेडी । अनेक क्रीडावोनि आवडी । अनेक देह सर्पाचे ॥६३॥
म्यां गर्भीहूनि कांचेच गळावे । मी कधीं पांचा दिवसांच सटवावे । कधीं तारुण्य होऊनियां जीवें । मदन वेडें पीडीतसे ॥६४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP