प्रसंग दहावा - चंचळ मन कसें आवरावें?
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
दहा सहस्र तोंडाचें मन । तें मजला न होयचि जतन । आतां सांगावा जी सद्गुरु प्रयत्न । मन आवरे ऐसा ॥२५॥
चंचळ मन वासना कल्पना । हें मज थोर अरिष्ट गा निर्गुणा । यावेगळें करी भवछेदना । आपुलिया सत्तामात्रें ॥२६॥
सद्गुरु म्हणती ऐक शिष्या उत्तर । मन हेंच की सर्वांचे सार । या मनेंचि होईजे उदार धीर । ईश्र्वरभजनालागीं ॥२७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP