प्रसंग दहावा - सद्गुरूची पृच्छा
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
धीर सद्गुरु बैसले नृपासनीं । तंव शिष्य उभा करसंपुष्ट जोडुनी । या दोहींचे आहिक्यतेलागुनी । श्रोतीं चित्त द्यावें ॥६॥
आतां सद्गुरु म्हणती शिष्यसुता । मजसारिखा तुज भेटला दाता । सकळ सांग तुझी भ्रमता । निःशंक होऊनियां ॥७॥
स्वयें सद्गुरूस करुनी प्रदक्षिणा । साष्टांग नमस्कारिलें भवछेदना । आरती करुनी सुंदर वदना । तनु मन वोवाळिलें ॥८॥
शेख महंमद म्हणे ऐका प्रौढी । अनेक स्थूळें धरुनी कल्पना आवडी । एकें एकें स्थुळीं चौर्यांशी लक्ष वेळी । सांगतां बुद्धि डोखले ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP