प्रसंग दहावा - उपाय
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
देह स्थूळ जन्माच्या गांजणुका । तुम्ही माझें एकाग्रपणें ऐका । मग माझिये चित्तश्रवणीं फुंका । ब्रह्मबीज अमोल ॥३६॥
कोणी एकाचें लडिवाळ बाळक । कोणी एकें त्रासील निःशंक । मग तो पिता देखोनि करी शोक । रडतां गहिवरें ॥३७॥
तैसा सन्मुख सद्गुरु पिता देखोनी । शेख महंमदा आठवली जाचणी । सांगतां साठवें ना अंतःकरणीं । प्रेमाचा वोरस ॥३८॥
सद्गुरूनें बरवें समाधान केलें । म्हणती सांग कवणें त्रासिलें । शेख महंमद म्हणे सांवरून जे बोले । तें श्रोतीं परिसावें ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP