प्रसंग दहावा - प्रसंग समाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
प्रसंग दहावा दशलक्षणी । समाप्त केला आनंदें आत्मज्ञानीं । बंधनाविण जन बंदीखानी । मृगजळ पर्वती जैसे ॥१०१॥
पुढें जें सांगेन तुजला गुज । तें शीघ्र करी बापा सहज । नको धरूं या जनाची लाज । शेख महंमद म्हणे सद्गुरु ॥१०२॥
सुख नाहीं तेथें कैचें दुखणें । ज्ञान नाहीं तेथे कैंचें शहाणेपणें । जन्ममरणाविण शेख महंमदा ठाणें । होईल तुजला खरें ॥१०३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP