प्रसंग चवदावा - अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
बिबवा ठेंचिल्या शेलिया उपरी । तो साबणें न निघे अद्यापवरी । तैसा हा गर्व मीपण लवकरी । ज्ञातियाला बाधी ॥४॥
उदें धुपविलें रांजणभर पाणी । तिळ एक हिंग पडतां सुटली घाणी । तैसें द्वैत मीपण अवलक्षणी । वागवूं नये चित्तीं ॥५॥
पुंगोळ फिरे पाहुणा शकुनधडी । ढक्का लागतांच तो घाण सोडी । थुंकोनियां केरसुणीनें बाहेर झाडी । शूद्री रांगें पेटोनियां ॥६॥
अधम ज्ञाता जाणे धडपडे । कुबुद्धिं पडल्या तो चरफडे । जन फटमर म्हणतां हूर पडे । हीन यातीस पडलियां ॥७॥
तैसा आत्मज्ञाता जाणे आम धडे । क्रोध मीपण ढक्क्यानें तो चरफडे । जन फटमर म्हणतां हुरपडे । हीन याति वाहूं नेणें ॥८॥
मी एक जाणता जन मूर्ख वेडें । हें जेथें उमटों लागे वाडेकोडें । तेथून आत्मज्ञान धडफुडे । पळोनियां जाय ॥९॥
पहा समुद्र पूर्णत्वें भरला । परी तो न उल्लंघी मर्यादेला । तैसाच ज्ञाता पाहिजे वर्तला । रंकांमध्यें रंकपणें ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP