प्रसंग चवदावा - शेख महंमद शब्दांवर टीका
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
‘शेख’ म्हणिजे सेवकपणें । ‘महंमद’ स्वयें जनार्दन । दोहीं नांवाचें मिश्रितपण । अभंगीं चालतसे ॥९०॥
सहा अक्षरी ‘शेख महंमद’ । अक्षरांचा वेगवेगळा सांगेन भेद । तेणें आनंदती साधु सिद्ध । टीका ऐकतां ॥९९॥
‘से’ म्हणजे सेविले सद्गुरुनिधान । ‘ख’ म्हणजे खळखळे वेगळें संपूर्ण । भाव धरून प्रेम उन्मन । सोऽहं तत्त्वबोधें ॥९२॥
दो अक्षरांची टीका जाली । पुढें तीं अक्षरांची आरंभिली । सावध पाहिजे ऐकिली । महा प्रश्र्निकीं ॥९३॥
‘म’ मायारहित जनार्दन । हें अहंकारावेगळें लक्षण । त्यास नाहीं बद्धता बंधन । निर्विकार सदा ॥९४॥
मागुतें ‘म’ अक्षर आलें । मळावेगळें परब्रह्म कोंदलें । म्हणवूनि अक्षर दुणावलें स्तवनालागीं ॥९५॥
‘द’ अक्षर मांडणें । स्तुति वर्णितां कष्टलीं पुराणें । अहं धरिती ते वेडे ॥९६॥
शेष जिव्हा जाल्या मुखाभितरी । नामघोषाची गोडी थोरी । प्रेमें सांडवें ना ॥९७॥
वेदांसारिखे कुशळ तोंड तें । तें नामघोषी नाहीं जालें पुरतें । निमिष पळ स्मरतां उद्धरतें । चांडाळादि करुनी ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP