प्रसंग चवदावा - ज्ञात्याचा समभाव
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आत्मज्ञानें वाणी बोलतेवेळे । अंतर्यामी रंकपणें कळवळे । त्याला होती सायुज्जता सोहळे । सद्गुरुकृपा बाणली अंगीं ॥११॥
शूर शूरत्वपणा करून आला । संभ्रम देखोनि विश्रांति पावला । उठवितां काकुलती येवों लागला । तदन्यायें जाला सत्पुरुष ॥११॥
बाष्कळ बोलणें नावडे तयाला । विधि-वित्पत्तिलागीं आंचवला । सोऽहं अखंड बोधीं बोधला । जन विजन सम तयाला हो ॥१२॥
जैसा अन्नाविण प्राणी पीडला । पंथीं चालता पेणावोनि भागला । तो बोलतां विकारें सांडवला । तैसे बोधाचें चिन्ह ॥१३॥
एक दो ती वरुषाचें बाळ । नग्न मातेवरी करी चळवळ । परि त्याचें दृष्टीस नाहीं तरळ । चंचळ विषयावरी ॥१४॥
पाप पुण्य न कळेची तया बाळा । शुच अशुच नेणें विटाळा । कर्माधर्माचा नाहीं मळमळा । अज्ञान म्हणोनियां ॥१५॥
ऐका कनक आणि कांता । हें तंव न ये त्या बाळकाच्या चित्ता । साधु चुकले स्वहिता । सोऽहं गुज विसरोनियां ॥१६॥
ज्ञानांत अज्ञान वोसंडोनि संपूर्ण । आचरे बालकाचें आचरण । येणें न्यायें ज्ञान अज्ञान । जनक विदेही आचरिले ॥१७॥
ऐका गोडामाजी कडवटपण । हें तंव असे बीज मुळापासोन । अज्ञान ज्ञान विज्ञानाचें भूषण । मिश्रित असें एकमेकीं ॥१८॥
सेंदाडाचें बीज चारोळ्यांची मजा । तैसें विज्ञान सांगतों निज गुजा । सेंदाड कडू तैसें अज्ञान समजा । सर्वत्र येणें न्यायें ॥१९॥
सेंदाड पक्व गोडीस आलें । तैसें जिवीं शिवीं साधुत्व निवडिलें । परी अज्ञान ज्ञान विज्ञानलें । त्रिपुटीच्या संगें ॥२०॥
सेंदाडाचें बीज खातां लागे गोड । पेरिल्या कां कडू सांगा निवाड । श्रोत्यांनीं पूस घातली अवघड । शेख महंमदालागी ॥२१॥
शेख महंमदीं सद्गुरु धांवरिला । सकळ श्रोत्यांसी नमस्कार केला । निज निवाड सांगों आरंभिला । गोडांत कडुपणाचा ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP