मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - प्रसंग समाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग समाप्ति Translation - भाषांतर समाप्त प्रसंग चौदावा । तोडिल्या पाखांड अविद्येचा हांवा । श्रोत्यावक्त्यांच्या निज दैवा । शेख महंमद वदे ॥१३०॥श्रोते एकचित्तीं सावधान । ऐका परमार्थाचे करुनी कान । हृदयामाजी व्हावें समाधान । गोदानीरन्यायें ॥१३१॥गोदानीर ताविल्या तापतें । निवविल्या निवांत असते । तैशी नव्हेत ही साधुमतें । अनादिसिद्ध शुचित ॥१३२॥संत तीर्थव्रताचें अधिष्ठान । पुण्यपावन साधूचें चरण । म्हणोनि सेविती रामकृष्ण । अवतार धरूनियां ॥१३३॥शेख सैय्यद महंमद महंमदीं । ग्रंथ चर्चिला निजप्रेमाचा बोधी । श्रोते पातले आशिर्वादी । जय जयकार वचनें ॥१३४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP