प्रसंग चवदावा - मल्‍हारीच्या मुरळ्या वाघे व भार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पुण्य आचरण न ये मुरळ्यांच्या चित्ता। त्‍याच्या होतील कांता । त्‍यांचा हात भाळास लावितां । कोण तरला सांग बा ॥५५॥
भाळ बाडगी पुढें ओढवी । म्‍हणे तूं आपुल्‍या हातें लावी । मुरळी डोळे घालूनि खुणावी । त्‍या मुरळ्यालागुनी ॥५६॥
जे आपल्‍या कुळस्‍वामीची मुरळी । तिसी कैसे खेळती ढवाळी । ऐसी कलियुगीं प्रभावळी । पापाची वर्ततसे ॥५७॥
मुरळ्या कुळस्‍वामिच्या दासी । त्‍यांसी रमता कंटाळेत ना अपेशी । मल्‍हारी न करीच कांही त्‍यांसी कां सत्‍वें सांडवला ॥५८॥
कुळ कन्येस बोल लाविला मल्‍हारीनें । ऐसें विटंबिलें त्‍याच्या देवपणें । तो पुजिल्‍या केंवी तुटली बंधनें । लक्ष चौर्‍यांशीचीं ॥५९॥
पां ईश्र्वरें मागितलें श्रियाळा । तेणें भोजना वधिलें चिलिया बाळा । मागुतें उठविलें बा तातवेळा । कांतेसहित उद्धरिलें ॥६०॥
ऐसें ज्‍याचें बालक घ्‍यावें । त्‍यांस पूर्वजांसहित मोक्षास न्यावें । नाहीं तरी कां सुफळ निर्फळ करावें । देव म्‍हणवूनियां ॥६१॥
मल्‍लिकार्जुनाचा देखोनि भाव । आले कैलासीचे राव । चरण जाळूनि तत्त्वीं ठेविला जीव । पंक्तीस बैसविला ॥६२॥
अज्ञ ससाणा इंद्र कपोता । चक्रवर्तीचा भाव पाहाती तत्त्वतां । मांऊसें तुकाविलें होऊनि मागुता । प्रसन्न जालें छेदितां शिर ॥६३॥
तैसेचि कर्णास रणभितरीं । बाण खडतरले तळमळ करी । विप्रवेषें मागता श्रीहरि । आदरें दंत पडतां प्रसन्न जाला ॥६४॥
सुदाम्‍याचे मुष्‍टि पोहे घेऊन । शीघ्र सुदामपुरी दिधली गहन । ऐसी उदारीव नाहीं देवतांलागून । लेकुरें मागोन बुडविती ॥६५॥
तैसा नव्हे भक्तवत्‍सल गोपाळ । अंबॠषीचें गर्भ तत्‍काळ । चुकवूनि केला तो प्रबळ । भक्तांचा महिमा वाढवी ॥६६॥
ऐका नामरत्‍नमाळेमाझारी । श्रीमुखें भक्तांचें स्‍तवन करी । हरि उणें पडों नेदी अद्यापवरी । नामा संत लडिवाळ म्‍हणोनियां ॥६७॥
गीता भागवती वनमाळी । वाखाणी भक्तांची ब्रीदावळी । म्‍हणे भक्त माझी निज रांगोळी । स्‍वहृदयीं जपत असे ॥६८॥
ऐसें सांडोनियां श्रीपति । लेकीस करिती मुरळी भूती । कुमारांस श्र्वानें करुनी भुंकविती । मनुष्‍य असतां ॥६९॥
हळदी भंडार विकी वाणी । तैसी देवतांनीं केली झकवणी । जेथून साकारल्‍या खाणीवाणी । त्‍यास भंडार बोलिजे ॥७०॥
वाणी ईश्र्वराविण नाहीं तत्त्वतां । जेथें इच्छिल्‍या केण्या नाहीं न्यूनता । हळदी मागोनि देवविती देवता । भंडार म्‍हणोनियां ॥७१॥
कर्मचांडाळा वर्जाया अहर्निशी । अनेक पापांच्या करुनी राशी । नामसाठी उद्धरण दिधलें त्‍यांसी । देवाधिदेवें ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP