प्रसंग चवदावा - शिंदळा भजक

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐसा शेट्या अविनाश कुबेर । त्‍याचें नांव ठेवणें अधर्म थोर । ऐसा न कळे पां विचार । भटा वैदिकाला ॥११९॥
वडाची साल पिंपळा लावी जन । जैसे बाईजी म्‍हणिजे सुनेलागुन । जाब न देती ते केलिया प्रयत्‍न । तैसे देवतांसी ईश्र्वर म्‍हणे ॥१२०॥
बापास भावोजी म्‍हणतां मेहुणेपणें । तो जाब नेदी हांसती पिशुनें । तैशा देवतां आळवितां ईश्र्वरपणें । साधु हांसती ॥१२१॥
जैसे बाईजीस म्‍हणतां मामीसे । म्‍हणती यास लागलें पिसें । तैसें संतांनीं केलें हांसे । जनाचें परियेसा ॥१२२॥
दीर भावजये पैं गेल्‍याउपरी । म्‍हणती चांडाळ अविचारी । ऐकतां राजा दंड करी । शिंदळ म्‍हणोनियां ॥१२३॥
तैसे देवतांचे भजक अवधारा । ते शिंदळा म्‍हणोन फटमरा । त्‍यास ईश्र्वर दंडिल विचारा । लक्षचौर्‍यांशी दुःखें ॥१२४॥
शेख महंमद आत्‍मज्ञानपणें । वक्तले सत्‍य सगुण वचनें । नमस्‍कार केले साष्‍टांग मनें । सद्‌गुरु स्‍वामी सेवा ॥१२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP