प्रसंग चवदावा - देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
भावें सेवितां सद्गुरु दाता । तो मस्तकीं कर ठेवी निज पिता । तेणें ईश्र्वर ओळखे तत्त्वतां । उन्मनि अंजनागुणें ॥१२६॥
ऐसे उपाय जाहिर असतां । मूढ पुजोनि राहती देवदेवता । अनाचारें भ्रष्टले आपुल्या मता । अवगुणाचे गुण मानिती ॥१२७॥
जे जे देवीदेवतांस भजती । ते आयागमन फेरे फिरती । हे प्रसिद्ध साधुजन बोलती । आगमनिगम वचनें ॥१२८॥
तैसा नव्हे निज परमेश्र्वर । जो तारी हा भवसागर । कल्पकल्पांतीची दैना थोर । खंडें त्याचें भजनें ॥१२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP