प्रसंग चवदावा - निवाडा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐका संतश्रोते कुशळ मूर्ती । खसखस खानाधाऐसी लगती । पेरिल्‍या खसखस अफू होती । कडू विकारी ॥२३॥
वोळखागोड कडू मधुर । एक ठायीं प्रकृति अंकुर । वेळा काळें बीजीं विकार । शुभाशुभ भावना ॥२४॥
बहुत सांगो करूनी उघड । तरी ‘तत्त्वबोधी’ आहे निवाडा येथे सांगावयाची कोण चाड । असेच ना कांहीं ॥२५॥
आतां ऐका पंडित चतुर । जनांस सांगतो सुस्‍पष्‍ट विचार । आपण करी अनाचार । जगत्रय भोंदूनियां ॥२६॥
सकळ भोग करूनी अलंकार । यावेगळा मनुष्‍याचा आकार । दुसर्‍यास सांगें शुद्ध बुद्ध विचार । शब्‍दसंस्‍कारें ॥२७॥
सांगती महा कुशळतेच्या गोष्‍टी । कामव्यसन धडाडितसे पोटीं । बोलभांडाची अहंता चटपटी । अभिमान धरूनियां ॥२८॥
साळुंखी रावा पढों शिकविला । पंडित मनुष्‍य काय नवलाव जाला । मुख्य आचरण पाहिजे आचरला । कहणी तैसी रहणी ॥२९॥
महा पंडित चतुरालागोन । पशू म्‍हणतां तो होईल क्रोधायमान । परी पशूची उपमा गहन । पंडित तुका न येती ॥३०॥
पंडित नाना शास्त्रें पठण करी । गर्भ सामावल्‍या नेणें ॠतु हेरी । उन्मत्तपणें रमण करी । गरोदरा वनितेसी ॥३१॥
आतां धन्य धन्य ते पश्र्वादिक । ज्‍यांच्या उपकारा दाटले तिन्ही लोक । सकळ धनधान्य होय पिक । बळिभद्राचें कमाईनें ॥३२॥
जे वाची त्‍याचा नेणें भेद । नाहीं तोचि वाढवी अनुवाद । तूं-मीपणा करितां गोविंद । अंतरले पंडितासी ॥३३॥
बहुत सांगों करूनि उघड। तरी ‘तत्त्वबोधी’ आहे निवाड । येथें ही सांगावयाची चाड । असेच ना ॥३४॥
आतां धन्य धन्य ते धेनु माउली । विश्र्वालागीं क्षीरपान्हा द्रवली । ब्रह्मा वैश्र्वदेव मुखीं घाली । घृत पवित्र तिचें ॥३५॥
मातेच्या दुधें वाचें ॥३६॥
धेनु मृत्‍यु जेव्हां पावली । चर्म मांस आभार सांगतां उदंड । धेनुमउत्तम केली । त्रैलोक्‍य मही स्‍थळीं ॥३७॥
यालागीं कारणीं लागलीं । शेण गोमुमेनुष्‍य उपजतां चारी लोणी । ब्रह्मा विष्‍णु महेश लाविले धेनु विश्र्वाची जननी वाढविले ॥३८॥
‘अ’कारेंसी ‘उ’कार ‘म’कार । त्रिपद स्‍तनीं आदिकरूनि चौथा पाव तो निज निर्धार । स्‍वयें साधु जाणती ॥३९॥
त्रिनावें साचार ‘उ’कारी विष्‍णु । ‘म’कारी महेश तो आपणु । हे वोळखा त्रिपुटीची ‘अ’कारी । खुण फेडी तो साधु सज्‍जन ॥४०॥
गुज कथेचें सांगतां राहिलें । तें पुन्हां सांगो आरंभिलें । सावध पाहिजे ऐकिलें । समस्‍त संतकुळी ॥४१॥
कोणाचें वर्म कर्म कुडे । पडलें असेल उघडें । मज म्‍हणो नये मूर्ख वेडें । सत्‌ वचनें श्रीगुरुचीं ॥४२॥
गीता भागवत पुराणें । अनेक ग्रंथ शास्त्रें गहनें । पदें कथिली सद्‌गुरुनाथानें । अनंत नांवे धरुनी ॥४३॥
जय परब्रह्म प्रसादलिंग । कदा भंगे ना स्‍वयंभ अभंग । अनेक रंगांचें वोरंग । होतील तयापुढें ॥४४॥
जैशी कारंज्‍याची कळा चालविली । ठायीं ठायीं उसासे नांव पावली । तैशी गुरुत्‍वें नांवे याति ठसावली । उदक मूळ जुनें ॥४५॥
बीज वट कृपाधरा अविनाशा । सद्‌गुरुसंगें आल्‍या तुझ्या विश्र्वासा । मग प्रेमबोधाचा तत्त्व ठसा । उमटला ग्रंथीं ॥४६॥
प्रसंग बारावा संपल्‍यावरी । तेरावा संपला धरूनि उरी । चौदाव्यानें आरंभिली संग्रामहेरी । शेख महंमद वचनें ॥४७॥
चौदावे प्रसंगीं आरंभिलें भांडण । उलटे दृष्‍टीचें शूरत्‍वपण । उर्ध्व हेरिले अंतरक्षिभुवन । मीन शेख महंमदीं ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP