चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं १२

सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


श्रुति :--- यथा क्षुर: क्षुरधानेऽवहित: स्याद्विश्वंभरो वा विश्वंभरकुलाये तं न पश्यन्ति । अकृत्स्नो हि स: ॥

अर्थ :--- ज्याप्रमाणें नापिताच्या क्षुरधानांत असलेला वस्तरा त्यांत घालून ठेवलेलासा उपलब्ध होतो किंवा विश्वाचें भरण करणारा अग्नि विश्वंभराच्या घरटयांत - काष्ठादिकांत प्रविष्ट झालेलासा उपलब्ध होतो. पण त्याला लोक पहात नाहींत. कारण त्यांत प्राणनादि क्रियांनीं विशिष्ट असलेला तो अकृत्स्न - असमस्त असतो. (तो संपूर्ण नसतो. तर त्या त्या क्रियेनीं पारीच्छिन्न झालेला असतो. म्हणून तोच परमात्मा आहे, असें त्याला कोणी जाणत नाहींत.)

भाष्यं :--- तत्र कथमिव प्रविष्ट इत्याह । यथा लोके क्षुरधाने - क्षुरो धीयतेऽस्मिन्निति क्षुरधानं तस्मिन्नापितोपस्कराधाने क्षुरोऽन्त:स्थ उपलभ्यतेऽवहित: प्रवेशित: स्याद्यथा वा विश्वंभरोऽग्निर्विश्वस्य भरणाद्विश्वंभरकुलाये नीडेऽग्नि: काष्ठादाववहित: स्यादित्यनुवर्तते । तत्र हि स मथ्यमान उपलभ्यते ॥

भाष्यं :--- यथा च क्षुर: क्षुरधान एकदेशेऽवस्थितो यथा चाग्नि: काष्ठादौ सर्वतो व्याप्यावस्थित एवं सामान्यतो विशेषतश्च देहं संव्याप्यावस्थित आत्मा । तत्र हि स प्राणनादिक्रियावान्दर्शनादिक्रियावांश्चोपलभ्यते तस्मात् । तत्रैवं प्रविष्टं तमात्मानं प्राणनादिक्रियाविशिष्टं न पश्यन्ति नोपलभन्ते ॥

भाष्यं :--- नन्वप्राप्तप्रतिषेधोऽयं तं न पश्यन्तीति । दर्शनस्याप्रकृतत्वात् । नैष दोष: सृष्टयादिवाक्यानामात्मैकत्वप्रतिपत्त्यर्थपरत्वात्‌प्रकृतमेव तस्य दर्शनम् । “रूपं रूपं प्रतिरूपो बभूव तदस्य रूपं प्रतिचक्षाय” इति मन्त्रवर्णात्‌ । तत्न प्राणनादिक्रियाविशिष्टस्यादर्शने हेतुमाह । अकृत्स्नोऽसमस्तो हि यस्मात्स प्राणनादिक्रियाविशिष्ट: ॥

श्रुति :--- प्राणन्नेव प्राणो नाम भवति । वदन्वाक्पश्यश्वक्षु: श्रृण्वञ्श्रोत्रं मन्वानो मनस्तान्यस्यैतानि कर्मनामान्येव । स योऽत एकैकमुपास्ते न स वेदाकृत्स्नो हयेषोऽत एकैकेन भवत्यात्मेत्येवोपासीतात्र सर्व एकं भवन्ति ॥

अर्थ :--- तो प्राणनक्रियाच करणारा प्राण या नांवाचा होतो. तसाच ‘वदन्’ - भाषण ही क्रिया करणारा तो वाक या नांवाचा होतो. पहाणारा तो चक्षु, ऐकणारा श्रोत्र, व मनन  करणारा तो मन होतो. हीं त्याचीं कर्मनार्मेच आहेत. या प्राणनादि क्रियासमुदायांतून जो प्राण, चक्षु इत्यादि एकेका क्रियेनें विशिष्ट अशा आत्म्याची उपासना करितो [म्ह० जो प्राणनक्रिया करणारा तो आत्मा, जो दर्शनक्रिया करणारा तो आत्मा, असें परिच्छिन्न आत्म्याचें चिंतन करितो -] तो ब्रम्हाला जाणत नाहीं. कारण तो प्राणनादि एकेका क्रियेनें विशिष्ट असलेला आत्मा असमस्त - अपूर्ण आहे. यास्तव तो एकेका विशेषणानें विशिष्ट होतो. यास्तव तो आत्मा - प्राणादि सर्व कार्य करणांना व्यापणारा आहे, अशीच त्याची उपासना करावी. कारण त्या आत्म्यामध्यें ते सर्व भेद एकरूप होतात.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP