चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं ३३
सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
श्रुति :--- स नैव व्यभवत्स शौद्रं वर्णमसृजत पूषणमियं वै पूषेय हीद सर्वं पुष्यति यदिदं किंच ॥१३॥
अर्थ :--- पण तो ब्राम्हाणाभिमानी कर्म करण्यास समर्थ झाला नाहीं. म्हणून तो शूद्रवर्णास उत्पन्न करिता झाला. पूषा हाच तो शूद्रवर्ण होय. ही पृथ्वीच पूषा आहे. कारण तीच हें जें कांहीं आहे त्या सर्वांचें पोषण करिते. ॥१३॥
श्रुति :--- स नैव व्यभवत्तच्छेयोरूपमत्यसृजत धर्मं तदेतत्क्षत्रस्य क्षत्रं यद्धर्मस्तस्माद्धर्मात्परं नास्त्यतो अबलीयान्बलीया समाशा सते धर्मेण यथा राज्ञैवं यो वै स धर्म: सत्यं वै तत्तस्मत्सत्यं वदन्तमाहुर्धर्मं वदतीति धर्मं वा वदन्त सत्यं वदतीत्येतद्धयेवैतदुभयं भवति ॥१४॥
अर्थ :--- पण तो तरीसुद्धां कर्म करावयास समर्थ झाला नाहीं. म्हणून त्यानें धर्म हें श्रेयोरूप अतिसयपणें उत्पन्न केलें. धर्म हें क्षत्राचेंहि क्षत्र - नियन्तृ - आहे. म्हणून धर्माहून श्रेष्ठ कांहीं नाहीं. म्हणूनच धर्माच्या योगानें एखादा अतिशय दुर्बल असलेला मनुष्यहि आपल्यापेक्षां अतिशय बलाढय असलेल्या मनुष्याला जिंकण्याची इच्छा करितो. व्यवहारांत जसा एखादा साधारण कुटुंबीहि राजाच्या साहयानें दुसर्या प्रबलाला जिंकण्याची इच्छा करितो त्याप्रमाणें. तो जो धर्म तें सत्यच होय. म्हणून सत्य बोलणाराला ‘हा धर्म बोलतो’ असें म्हणतात व धर्म बोलणाराला ‘हा सत्य बोलतो’ असें म्हणतात. यास्तव ते दोन्ही धर्मच आहेत. ॥१४॥
भाष्यं :--- स चतुर: सृष्टवाऽपि वर्णान्नैव व्यभवदुग्रत्वात्क्षत्रस्यानियताशडकया तच्छ्रेयोरूपमत्यसृजत कीम तद्धर्मं तदेतच्छ्रेयोरूपं सृष्टं क्षत्रस्य क्षत्रं क्षत्रस्यापि नियन्तृ । उग्रादप्युग्रम । यद्धर्मो यो धर्मस्तस्मात्क्षत्रस्यापि नियन्तृत्वाद्धर्मात्परं नास्ति । तेन हि नियम्यन्ते सर्वे । तत्कथमिति । उच्यते । अथो अप्यबलीयान्दुर्बलतरो बलीयांसमात्मनो बलवत्तरमप्याशंसते कामयते जेतुं धर्मेण बलेन । यथा लोके राज्ञा सर्वबलवत्तमेनापि कुटुम्बिक एवम् । तस्मात्सिद्धं धर्मस्य सर्वबलवत्तरत्वात्सर्वनियन्तृत्वम् ॥
भाष्यं :--- यो वै स धर्मो व्यवहारलक्षणो लौकिकैर्व्यवर्हियमाण: सत्यं वै तत्सत्यमिति यथाशास्त्रार्थता स एवानुष्ठीयमानो धर्मनामा भवति । शास्त्रार्थत्वेन ज्ञायमानस्तु सत्यं भवति ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP