देवी चरित्र - सत्वप्रकाशाने वासनादमन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २५-९-१९३०

विरुद्धवासना मनी उठवोनी । जिंकाव्या त्या झणी दुर्वासना ॥१॥
विषयवासना उठती जैशा जैशा । माराव्या त्या तैशा धैर्यबळे ॥२॥
तेथे हटालागी हटाचेच काज । तेणेच निर्बीज होतील त्या ॥३॥
विरुद्ध वासनेच्यायोगे जिंकायासी । सुलभ मनासीं घडतसे ॥४॥
जी जी वृत्ती उठे मनांत तांतडी । दुजी तैशी उडी आदरावी ॥५॥
रोगें रोग जैसा मारिती कुशल । वासना प्रबळ शमवाव्या ॥६॥
हेच गुह्य आहे देवीचरित्रांत । जाणिती पंडित रहस्याते ॥७॥
विनायक म्हणे जोवरी होय ज्ञान । सत्वप्रकाशन मार्ग हाच ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP