देवी चरित्र - रंभवध
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
घेवोनी महिषीसी, पाताळांत जाय । गर्भवती होय, महिषी ती ॥१॥
दुजीया महिषाने तिज अडवितां । रंभ अवचितां युद्ध करी ॥२॥
मारीला महिषे तेव्हां रंभासुर । महिषी तेव्हां वर, येत जाणा ॥३॥
यक्षानी मारिला जाणतो महिष । तेणे होय तोष महिषीला ॥४॥
मग ती महिषी रंभासमवेत । आपणासी घेत जाळोनियां ॥५॥
दहन होतां दोघां महिष निघाला । गर्भातूनी भला महिषीच्या ॥६॥
रंभदेहांतुनी उद्भवे रक्तबीज । ज्याचे परम ओज असे जाणा ॥७॥
विनायक म्हणे महिष, तप, करी । मेरु गिरीवरी वरासाठी ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2020
TOP