देवी चरित्र - महिषाशी युद्ध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वश करायासी महिष झट्त । तंव युद्ध होत देवापाशी ॥१॥
जे जे धाडीयेले महिषाने शूर । सकळ सत्वर मारीयेले ॥२॥
तेव्हां महिषासी दारुण युद्ध घडे । तयामध्ये पडे महिष तो ॥३॥
मारोनी महिषासी सुरां राज्य दिले । सकळ जग केले शुद्ध जाणा ॥४॥
मग सूर्यवंशी पुरुष पाहोनी । तयांसी देवांनी राजा केले ॥५॥
विनायक म्हणे शत्रुघ्ने तो राजा । सुख झाले वाजा सकळांसी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP