देवी चरित्र - शुंभ-निशुंभ वध
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
तया दूतीं बहु देवीस बोधियेले । युद्ध मागितले देवींने त्या ॥१॥
तेव्हां धूम्रलोचन दैत्य पाठवीला । क्षणे निर्दाळिला देवीने त्या ॥२॥
चंड मुंड मग पाठवी असुर । तयांचा संहार करीतसे ॥३॥
मग रक्तबीज पाठवी दारुण । करी रक्तशोषण त्याचे देवी ॥४॥
तोही मारीयेला निशुंभ वधीला । शुंभ तो धांवला देवीवरी ॥५॥
त्याचा वध करी देवी भगवती । ऐसी हे महती चरित्राची ॥६॥
देवांलागी जय ऐसा प्राप्त होय । तयां स्वर्गठाय लाभले ते ॥७॥
मग आराधन करीती देवीचे । वर्णिताती साचे यश तीचे ॥८॥
पावेन भक्तांसी पुरवीन अर्थासी । ऐशिया वरासी देई देवी ॥९॥
विनायक म्हणे माहात्म्य देवीचे । काय वंदू वाचे पामर मी ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2020
TOP