देवी चरित्र - मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


ऋषि सांगे ऐसे आहे हे मोहन । प्राणिमात्र गुंतुन रहिलासे ॥१॥
म्हणोनियां करा देवीचे पूजन । करा आराधन भक्तीयुक्त ॥२॥
पूर्वी प्रळयकाळी जेव्हा आपोमय । वृत्त तेव्हा होय ऐकावे ते ॥३॥
तया जलामधी विष्णुनी शयन । केले होते गहन बहुकाळ ॥४॥
तेव्हां कर्णातुनी मळ जो निघाला । दैत्यरुप बनला तदाकाळी ॥५॥
मधुकैटभ दैत्य दोन ते मातले । ब्रह्मदेवा भले भेडसावीती ॥६॥
माराया विधीते पातले ते खळ । तेव्हां खळबळ थोर झाली ॥७॥
योगनिद्रेलागी ब्रह्मा प्रार्थितसे । तेव्हां सोडीतसे विष्णुलागी ॥८॥
जागे झाले विष्णु दैत्याते मारिती । ऐशी भगवती प्रगटली ॥९॥
विनायक म्हणे प्रादुर्भाव ऐसा । आदरे परीसा देवीचा हा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP