देवी चरित्र - वैश्यनृपास देवीचा वर

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सुमेधस मुनि सांगे वैश्यनृपां । तुम्ही करा तपा देवीसाठी ॥१॥
तोषवा देवीते पुरवील अर्थ । देवी ती समर्थ एक जगी ॥२॥
तयां वैश्यनृपां दिधलासे मंत्र । जो का इहपरत्र तारक की ॥३॥
करिती आराधन हवन रक्ताचे । आपुलिया साचे वैश्यनृप ॥४॥
प्रसन्न ती देवी राज्य राजयासी । ज्ञान त्या वैश्यासी देत असे ॥५॥
पुढलिया युगी राजासी कथित । मनु तूं खचीत होशील की ॥६॥
ऐसे हे माहात्म्य परम देवीचे । पुराणांत साचे वर्णियेले ॥७॥
तेणे भगवती होवो मज तुष्ट । पुरवो माझे इष्ट भगवती ॥८॥
विनायक म्हणे माझे सर्व काम । पूर्ण करो परम निजकृपे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP