देवी चरित्र - रंभकरंभ कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


पुत्रकामें दैत्य रंभ आणि करंभ । करिती आरंभ तपालागी ॥१॥
एके जलामाजी एके तीरावरी । तपश्चर्या तरी मांडियेली ॥२॥
करंभ जलांत इंद्रे निवटीला । मकररुपे भला जाणावे की ॥३॥
तेव्हा अग्निसेवा रंभ करोनियां । आपणा जाळाया सिद्ध झाला ॥४॥
प्रसन्न झाला अग्नि, माग वर, म्हणे । पुत्रकाम, तेणे, सांगितला ॥५॥
जिचेवरी मन तुझे बा जाईल । तीच वरशील जरी नारी ॥६॥
तुज पुत्र होय महाप्रतापवंत । अग्नि असे सांगत रंभालागी ॥७॥
विनायक म्हणे महिषीसी मन । रंभाचे मोहून गेले जाणा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP