देवी चरित्र - ब्रह्मदेवाचे असत्य कथन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सत्वगुण विष्णु न सांपडे अंत । सत्यचि कथित आला तेथे ॥१॥
परी ब्रह्मदेव रजोगुण मय । तया भ्रांति होय अभिमानाची ॥२॥
शिवलिंगावरुनी दल केतकीचे । पडले होते साचे तेव्हा जाणा ॥३॥
घेवोनियां दल सांगत प्रशंसा । आपण मोठा, तैसा विष्णु नाही ॥४॥
शिवशिरावरिल पुष्प म्यां आणिले । शोधाते लाविले लिंगाच्या की ॥५॥
केतकीदलाची विधिसाक्ष देत । तेही तैसे वदत विष्णुपाशी ॥६॥
तेव्हा विष्णु बोले लिंगाने सांगावे । तरीच सत्य व्हावे जगामाजी ॥७॥
कोपले ते लिंग ब्रह्मय शापित । भाषण वितथ केलेस तूं ॥८॥
केतकी दलाते शिव शापितसे । वर्ज्य केले असे तुजलागी ॥८९॥
माझिये पूजेत तुझा बा निषेध । करोनीयां क्रोध शिव बोले ॥१०॥
ब्रह्मदेव खोटे बोलिला म्हणोनी । विष्णु त्रिभुवनी पूज्य झाला ॥११॥
विनायक म्हणे मोह या मोठ्यांना । कैसा आवरेना महतीचा ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP