देवी चरित्र - रंभकरंभ कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शुंभनिशुंभ हे जाणा दोन भ्राते । पाताळांत होते बुद्धिमंत ॥१॥
दोघेही सुंदर तैसे सुलक्षण । अरिती आक्रमण महीवरी ॥२॥
पाताळांतुनी ते येती जाणा वर । तप ते दुष्कर करिताती ॥३॥
दुश्चर तप केले विधि संतोषला । वर द्याया आला तयांलागी ॥४॥
अमरत्व त्यांनी मागतां विधीसी । अशक्य वाचेसी बोलतसे ॥५॥
पुरुषापासोनी आम्हां वध नसो । बळीवंत असो आम्ही सदा ॥६॥
ऐसा वर त्यांनी ब्रह्मयापासोनी । घेतला मागोनी घोर तपे ॥७॥
त्यांनी स्वर्गठाव देवांचे घेतले । विश्व आक्रमीले समग्रत्वे ॥८॥
अधिकार जे जे होते की देवांचे । सकळ त्यांनी साचे आक्रमिले ॥९॥
तेच वरुण झाले तेच इंद्र झाले । शशी सूर्य झाले आपणची ॥१०॥
तेव्हां सकळ देव प्रार्थिती गुरुसी । सांगा उपायासी म्हणताती ॥११॥
गुरु सांगे तुम्हां भगवतीविना । उपाय न जाणा कांही दुजा ॥१२॥
विनायक म्हणे हिमालयावरी । तप सुर-वरी आरंभीले ॥१३॥
==
रंभकरंभ कथा

प्रार्थितां देवीसी प्रगटे अंबिका । पुसत सेवित कां तयालागी ॥१॥
देवी संगितला वृत्तांत दैत्यांचा । अत्याचार साचा त्याचा जाणा ॥२॥
तेव्हां प्रगटली देवी देहांतुनी । काली जे भवानी कृष्णवर्णा ॥३॥
तिने आश्वासन देवांसी दिधले । मारीन मी भले दैत्य थोर ॥४॥
दोन्ही देवी मग प्रगट जाहल्या । हिमगिरीसी भल्या सुंदर त्या ॥५॥
दुतीं सांगितला वृत्तांत शुंभासी । आम्हां स्त्रीरत्नासी देखीयेले ॥६॥
तूंच योग्य पती तया सुंदरीसी । तरी सत्वरेसी आणावी ती ॥७॥
विनायक म्हणे शुंभ थाडीतसे । द्रुत प्रेरीतसे दूतांप्रति ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP