देवी चरित्र - सुरथ राजाची कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सुरथ नामे राजा, राज्यभ्रष्ट झाला । परम खोचला अंतरांत ॥१॥
मृगयेचे मिषे जातसे वनांत । तेथे तया भेटत वैश्य एक ॥२॥
समाधि नाम त्याचे दोघे समदु:खी । दोघे अविवेकी वासनाग्रस्त ॥३॥
राजया तळमळ वैश्या तळमळ । सांचलासे मळ वासनेचा ॥४॥
सुमेधस ऋषि तयाचा आश्रम । शांत की परम देखोनियां ॥५॥
आश्रमी जाउनी मुनीसी वंदिती । उपाय पुसती दु:खमोक्षा ॥६॥
विनायक म्हणे माहात्म्य देवीचे । ऋषी सांगे साचे वैश्यनृपां ॥७॥


References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP