ओवी क्र. ३१ ते ४०

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


ऐसे हे प्रणिधान । परि ना रखिल्या भान ।
भलतेच शिरते न्यून । साधकामध्ये ॥३१॥
म्हणूनच करितो सावध । दिधला हा उपदेश बहुविध ।
अंतरी ठसव रे बोध । सत्‍शिष्या ॥३२॥
स्वगुरुला सादर । अन्यांबद्दल अनादर ।
तो स्वगुरुचाच अनादर । जाण बाळा ॥३३॥
स्वगुरुशी अन्यायांची तुलना । पाहणे काही न्यूनपणा ।
ही तो स्वगुरूचीच अवहेलना । जाण बाळा ॥३४॥
गुरु घेतला तू देहपणे । पाहिलाही देहपणे ।
परि तो सर्वाठायी गुप्तपणे । जाण बाळा ॥३५॥
ऐकल्या ज्ञानाचा गर्व । त्यातूनच पाहशी तू सर्व ।
सदा तुच्छता मुखावर । का बर बाळा? ॥३६॥
सहसाधकांची पाहून प्रगती । बिघडते तुझी गती ।
दिन होते तव मति । नकळत बाळा ॥३७॥
सुप्त लोभ प्रसिद्धीचा । आणि कौतुकसाठीचा ।
मांडशी प्रपंच योजनांचा । अनाठायी ॥३८॥
तू अजूनही संसारीच । गुरफटलेल्या अवस्थेतच ।
कळावे म्हणूनच । कटु सत्य बोल हे ॥३९॥
अजूनही नाही उशीर । तुझा तू सावर ।
येई येई रे सत्वर । गुणी बाळा ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP