जीवनसूत्र आणि विवेक

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


॥ जीवनसूत्र ॥
१. स्वधर्म क्रियायोग व उपदेश गुरुस्वरूपच आहेत, अत्यावश्यक आहेत.
२. यांचा अंगिकार हीच खरी श्रध्दा होय. हाच खरा पुरुषार्थ होय.
३. संतोष हीच खरी भक्ति व शक्ति, विनातक्रार जीवन श्रध्दा आणि सुशीलता हा प्राण होय.
४. शारीरिक व मानसिक स्वास्थ धडधाकटपणा आणि ईश्वरनामाची आवड हेच खरे भाग्य होय.
५. जीवनरथ रेटण्यासाठी अर्थरूपी इंधनाची आवशक्यता असतेच. लक्ष्मीचा उपमर्द, अति मोह व आति त्याग टाळणेच श्रेयस्कर असते.
६. गरज व हाव यातील भेद सदैव जाणून असावे.
७. अर्थ (पैसा) व अध्यात्म यांची सांगड जमल्याविना जीवन, साधना, व मोक्षप्रवास सुरळीत होणार नाही,
८. सच्चिदानंदस्वरूप सत्तेला गुरु माना, आपलं माना व तिच्यावर प्रेम करा. गुरुतत्वाचा अनुभव घेतलेले कैकजण अत्यंत आनंदाने तुमच्याकडे मार्गदर्शन देण्यासाठी येत राहतील, तुम्हास ती सच्चिदानंद अनुभूती येईपर्यंत ।
----------------------------------------------------------------------------------
॥ विवेक ॥
१. बुद्धी व भावना ह्यांचे योग्य मिश्रण.
२. विशेष वेचण्याची कला.
३. प्राप्त परिस्थितीशी सुसंवाद साधणे.
४. विचार, वेध, व कर्म.
५. प्रयत्नांना दैवाची साथ लाभते हे जाणून असणे.

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP