जे रास-तत्वज्ञान आपण पाहिले त्यात रास, तत्व व वर्ण यांचा जो संबंध दाखविलेला आहे त्याचा अर्थ असा की विशिष्ट तत्वाचे अधिक्य असून इतर तत्वेही ठराविक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीत असतातच. आकाश, तत्वही असतेच. म्हणजेच एका विशिष्ट वर्णाच्या व्यक्तीत इतर वर्णाचाही यथायोग्य सहभाग असतोच. चारही वर्णाच्या आधारे जीवन जगणे शक्य असते. आतापर्यंतच्या दोन्ही प्रकरणातील विवेचनावरून त्यात नेमकेपणा व स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केल्याने वाचकास शंका राहणार नाही असे वाटते. या तत्वज्ञानाचा उपयोग व्यापक आहे. शिक्षण संस्था चालविणे, राजकारण, सरकार स्थापना, परदेशांशी व्यवहार इ. अनेक क्षेत्रात कुशलतेने समाजहित व देशहित यांचे भान ठेवून करता येईल.
॰ वैश्य वर्णात शेती, व्यापार, उद्योग, व्यवसायात येतात. वैश्य वर्णाच्या निजतत्वचा म्हणजेच सत्याचा या वर्णातील व्यक्तींनी पाठपुरावा केला तर अनाचार फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
॰ क्षत्रिय वर्णाच्या व्यक्तींचे निजतत्व शीलरक्षण आहे. जर पोलिस दले, सैनिक दले, खाजगी सुरक्षा दले, सीमा सुरक्षा दले, तट सुरक्षा दले यात या वर्णाच्या व्यक्तींचे अधिक्य असेल तर निर्भयता, योग्य समयी अचूक व प्रभावी हल्ला आणि राजकारणी मंडळीचे अवास्तव दडपण झुगारून देण्याच्या क्षमतेमुळे या सर्व व्यवसस्था उत्तम अवस्थेला जातील.
॰ शूद्र वर्णातील लोकांचा उपयोग सर्वच क्षेत्रात प्रभावीपणे करता येईल कारण सेवा हा त्यांचा स्थायी भाव आहे. विशेष करून वैद्यकीय, शैक्षणिक, न्यायालयीन व प्रचारयंत्रणा या क्षेत्रात प्रभाव जास्त राहील.
॰ वीप्र वर्णाचा उपयोग शिक्षण, न्यायदान, व्यवस्थापन, संशोधन, निरीक्षक, इ. ठिकाणी करून घेता येईल.
हा विषय निव्वळ चर्चेचा नसून अंगिकार, प्रयोग सातत्याने निरीक्षण, परीक्षण करीत अचूकता वाढवित राहण्याचा आहे. भ्रष्टाचार म्हणजे वर्णाप्रमाणे स्वभाव प्रकट करण्याची योग्य कार्यक्षेत्रे न मिळण्याचा परिणाम होय. असा वैज्ञानिक अर्थ समाजापुढे सातत्याने यायला हवा.
एक लक्षात ठेवायला हवे की प्रारब्ध व षड्रिपु हे असल्याने स्वधर्मपालनावर निष्ठा टिकवून धरावी लागेल. ही निष्ठा व धीरच पुढे अनुकूलता अनुभवास आणेल. काम, क्रोध आदि षड्रिपुंनाही रिपु न मानता मंगल उपदेश व स्वधर्म यांच्या आधारे योग्य दिशा देऊन या महान शक्तिचा वापर हितासाठी करता येईल.
प्रत्येकास अनेक नाती जन्मतः प्राप्त होतात व जीवनप्रवासात प्राप्त होत राहतात. प्रत्येक नात्याला प्रेमाची एक छटा असते. ती छटा पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करीत राहिल्यास जीवन प्रेममय होऊन जाईल.
खरंच! असे लिहीत असताना हृदय फार भरून येतं. वाटत या ' भाग्योदय' पुस्तकाचा सदुपयोग खूप खूप लोकांनी करून सुखी व्हावं.
॥ सुखमय समाधानी होवो पृथ्वीचे अंगण ॥
===================
॥ विशेषत्व ॥
अशा तर्हेने संपन्न झालेल्या वाग्यज्ञाची सांगता शांतिमंत्रोच्चाराने करणे किती उचित होईल नाही.
ओम सहनाववतु सहनौभुनक्तु । सहवीर्यम करवावहै ॥
तेजस्वी नावधितमस्तु । माविदविषावहै ।
ओम शांति: शांति: शांति:
==
लिहून झाल्यावर खालील भजन स्फुरले-
॥ राम कृष्ण हरि ॥
खरोखरी, खरोखरी । व्हावे घरोघरी ॥
रामकृष्ण हरि । जय राम कृष्ण हरि ॥धृ ॥
नको होऊ रे भिकारी । नको फिरूस दारोदारी ।
स्वधर्मरूपी आण सत्वरी । कामधेनु घरी । रामकृष्ण हरि ॥१॥
जय राम कृष्ण हरि । जय सच्चीदानंद श्रीहरि ।
सर्वाठायी प्रकट करि । उपदेशू लवकरी ॥ रामकृष्ण हरि ॥२॥
सर्व लिहून झाल्यावर माऊलींना वाचून दाखविले व त्यांच्याकडे पाहिले. बघत असतानाच स्फुरण आले, ''बाळा आज पुन्हा पसायदान मागावेसे वाटत आहे.'' माऊलीचा जिव्हाळा, प्रेम, ज्ञान, हळुवार, समदृष्टी, विश्वाविषयी कळकळ या सार्यांबद्दल आदर, कृतज्ञता व निष्ठा प्रकट करण्यासाठी म्हणावेसे वाटते -
किंबहुना तुमचे केले । धर्मकीर्तन हे सिद्ध नेले ।
येथ माझे जी उरले । पाईकपण ।