स्वधर्माची कार्यपध्दती
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
आपणास भोग ज्या क्रमाने भोगायला लागतात त्यात कधी अनुकूलता तर कधी प्रतिकूलता जाणवते. मानवास अनुकूलताच प्रिय असते. भोग संपविणे, अनुकूलतेचे प्रमाण वाढविणे व त्यात समन्वय साधत राहण्यासाठी स्वधर्मोपासना, क्रियायोग व साधना यांची आवश्यकता असते. यामुळे व्याधि व दु:ख निवारण प्रक्रिया सुरू होतात. हे लक्षात घेतले पाहिजे की भोगसंख्या कमी होत नसून भोगांचा क्रम व त्यांची समूह रचना यात बदल होतो व त्याचा परिणाम म्हणून अनुकूलता अनुभवास येऊ लागते. भोगभोगूनच संपतात. प्रारब्ध बलवत्तर असते हे खरे पण या स्वधर्मातही सामर्थ्य आहेच. तसेच ईशकृपा, गुरुकृपा, आशीर्वाद यांचे सामर्थ्य श्रेष्ठ व अनाकलनीय आहे. स्वधर्म ही बाब वेदप्रतिपाद्य आहे. भगवंतांनी त्याचे समर्थन केलेले आहे व माऊलींनी त्यास कामधेनु ही उपमा बहाल केलेली आहे. स्वधर्माचरणच हितावह आहे. त्यावर निष्ठा ठेवल्याने त्याचे बल प्रकट होऊ लागेल. स्वामी स्वरुपानंद (पावस) सुंदरपणे सांगतात,
स्वाधिकाराचेनि नावे, जे वाटिया आले स्वभावे ।
ते आचरोनि विधी गौरवे । शृंगारूनिया ॥
या, प्रेमाने या. स्वधर्म दिक्षा घ्या. उपदेश अनुग्रह घ्या.
त्वरा करा.
अनेकांनी लाभ घेतलेला आहे. आपणही घ्या.
॥ हरि ओम तत् सत॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP