पसायदान
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसुर्ये पाहो ।
जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणीजात ॥
वर्षंत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूतळी । भेटतु या भूतां ॥
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषांचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मा त ड जे तापहीन ।
ते सवाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्वसुखी । पुर्ण होवोनि तिहि लोंकी ।
भजिजो आदिपुरूषी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इथे ।
दृष्टादृष्टविजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरे ज्ञान देवो । सुखिया झाला ॥
मागणी--
व्हावी नवलाई । स्वधर्मनिष्ठांची मांदियाळी ।
सर्वत्र भूतळी । व्हावी आता ।
॥ श्री निवृत्तीनाथ महाराज की जय ॥ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ॥
॥ श्री गोपालकृष्ण महाराज की जय ॥ ॥ राधे:शाम । राधे:शाम ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP