केशवस्वामी - श्लोक संग्रह ६

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

ज्याचे पदीं सर्व विसर्ग नाहीं । विलोकिती पंडित त्यासि पाही ॥

समर्थ ते सर्व भया पहारी । सेवी दयासिंधु निजावतारी ॥२५१॥

जव नव्हे मन पांगुळ पाही । तव नसे सुख केवळ कांहीं ॥

गुज असे भवतारक बोले । कवि सदाचवि घेउनि बोले ॥५२॥

जोडूनिया संतपदाब्ज जोडी । घेतो सदा सार विचार गोडी ॥

यालागि बेडी तुटली भवाची । संप्राप्ति झाली निज राघवाची ॥५३॥

जनी वनी दाउनि रामराणा । निवारिला दुर्जय भेद जाणा ॥

सेवा तुह्मीं संत दयाळ तेहो । त्याच्या पदीं चिन्मय होय देहो ॥५४॥

ज्याची वाणी दाखवि चक्रपाणी । त्याचे माथा वंदिता पादपाणी ॥

पाणी वाहे अंतरी चित्सुखाचें । लागे पायीं शून्य नाना मखाचे ॥५५॥

जेणे द्वारे द्वारकानाथ जोडे । तेणे द्वारे चालता जन्म मोडे ॥

ऐसे योगी जाणती भेद भागी । त्याचे संगी पाविजे कृष्णवेगी ॥५६॥

जयाची पदे वंदिती देव जाणा । जया वर्णिता मौन्य वेदा पुराणा ॥

चिदानंद तो राम कैवल्य राणा । स्मरा सर्वंदा हा जळे कर्मघाणा॥५७॥

जो संचला येक अनेक ठायीं । जो देखिल्या भेद नुरेचि कांहीं ॥

ज्याच्या पदीं भेद अभेद नाहीं । तो भेटला रे निजराम पाहीं ॥५८॥

जया चिंतिता शोक गेला दिगांता । जया लक्षिता शून्य संसार चिंता ॥

जया भेटता भेटि नेदी अहंता । तया सद्‌गुरुचे मनी पाय चिंता ॥५९॥

शिवाशीवाचा लवलेश कांहीं । ज्याच्या स्वरुपी अणुमात्र नाहीं ॥

विश्राम तो राम मुनी जनाचा । ध्याता नुरे ठाव षा मनाचा ॥२६०॥

जो चिंतिता संशय वस्त्र फाटे । जो लक्षिता भेद समुद्र आटे ॥

जो भेटता बोध अगाध दाटे । त्यावेगळे सार दुजे न वाटे ॥२६१॥

जो प्रेमे विटेवरी नीट आहे । आवीट भावेचि तयासि पाहे ॥

घेऊनिया मायिक वीट आता । वंदी मना विठ्ठल पायमाथा ॥६२॥

जो सर्वदा भक्तिपंती पडेहो । जो सर्वदा शांतिजळी बुडेहो ॥

जो सर्वदा संतपदी जडेहो । त्यातेचि हा राघव सांपडे हो ॥६३॥

जो सर्वदा चिन्मय सार सेवी । त्याच्या क्रिया सर्वही ज्ञानदेवी ॥

ऐसे कवी केशव राजबोले । अबोलणा मीच कळोनि डोले ॥६४॥

जो चिंतिता पावन सर्वसृष्टी । त्याचे पदीं सावध घालि दृष्टी ॥

तेणे गुणे निर्गुण पुष्टि जोडे । माया उडे भेद तरुचि मोडे ॥६५॥

जया चिन्मया शोधिता शास्त्रबोधे । क्रियाकानने दग्ध निर्वाण बोधे ॥

तया आठवा आठवातीत देवा । करु निवांत नित्य अद्वैत सेवा ॥६६॥

जीव दशा असता जिव लोका । परि सदा शिव हे अवलोका ॥

तरि तुह्मा हृदयीं शिव राहे । शिवमयी श्रुति हे वदताहे ॥६७॥

जप तप करिताही तो कधी प्राप्त नाहीं । सुखनिधी हरितो म्या देखिला सर्व ठाई ॥

ह्मणवुनि बहु धालो पूर्ण लोभे निवालो । कवि ह्मणे जगदात्मा संत संगेचि झालो ॥६८॥

जनी वनी समचिन्मय दाटले । निरखिता भवमंडळ आटले ॥

समरसे मनही समदाटले । कवि ह्मणे अति कौतुक वाटले ॥६९॥

जरि सदा गुरुच्या पदा । तरि कदा न घडे भव आपदा ॥

तनु मदा परते मग ठेविशी । ध्रुवपदा परते पद पावशी ॥२७०॥

जन मिषे घनचिन्मय संचले । न कळता जन व्यर्थचि वंचले ॥

जरी नी केवळरेन पद आपले । तरि स्वये निजनिस्थळये कळे ॥२७१॥

जेथें नसे भाव अभाव कांहीं । जयासि हा नेमक ठाव नाहीं ॥

तया पदा संत बळेचि गेले । अनंत होवोनि निवांत ठेले ॥७२॥

ज्याचा वाटे लागता प्रेम दाटे । ज्याच्या पायीं घोर संच्यार आटे ॥

ज्याच्या संगे मोडला रंग थाटे । सर्वात्मातो भेठता सर्व भेटे ॥७३॥

जरी करे हरि केवळ माय । तरि लया ममता मिळ जाय ॥

मन गळे वितुळे तरिमाया । सुखवधू मग होईल काया ॥७४॥

झाला जया चिन्मय बोधपाही । ते नेणती भेद अभेद कांहीं ॥

त्रिवेद ही त्यास विनोद वाटे । पदोपदीं एक प्रमोद दाटे ॥७५॥

झाली मृषा आत्मसुखें फळाशा । यालगि नेणेचि फळाभिलाषा ॥

सदा निजानंद पदी विराजे । नवर्णवे भाग्य अगाध माझे ॥७६॥

जो सर्वदा ज्ञान नदीस न्हाला । साकल्यजो पूर्ण पदी निवाला ॥

धाला सुखे केवळ ब्रह्म झाला । त्याच्या गळा धावुनि हातघाला ॥७७॥

जपी तपी रे अवघे रंग पीरे । हे गर्जती चित्सुख मग पीरे ॥

बैसे तयाच्या पद मंडपीरे । क्रिया सरेतो निजमध पीरे ॥७८॥

जो चालवी चिन्मय लाड माझा । दयाळ तो सद्गुरु देवराजा ॥

मातापिता नाम तयासि साजे । पायी कवी आत्मसुखे विराजे ॥७९॥

अकस्मात हा मंदिरा राम आला । मनोवृत्तिचे बैसणे पूर्ण घाला ॥

नका वेळ लावू उटा शिघ्र आता । जगन्नायकाचे धरा पाय माथा ॥२८०॥

आंगी जया लागुनि आंगनाहीं । संगीच हा संग नुरेचि कांहीं ॥

भंगी कदा भंग नसे तयाला । अभंगतो केवळ राम झाला ॥८१॥

अलक्ष हे वेद ह्मणे जयाते । झाला मृषा सर्व विचार तेथें ॥

त्याचिप्तदीं धोपट मार्ग केला । क्षणक्षणा तोचि दयाळ बोला ॥८२॥

असोनि माया मय अंतवंती । आरुढती स्वर्गगती अनंती ॥

न जाणती सर्व क्रियाविधाना । निदानते हेचि निदान माना ॥८३॥

अत्यंत झाला परिपाक पाहीं ।भवार्णवाचा मज धाक नाहीं ॥

निष्कामधामी समसार नामीं । स्थिरावलो सर्व गताभिरामी ॥८४॥

अदृश्य हे सर्वही दृश्य भासे । याकारणे भास अभास नासे ।

नासे न नासे ह्मणणे नसाहे । ऐसाचि हा सार विचार आहे ॥८५॥

अत्यंत झाला जन आंधळाहो । यालागि आला भव गोंधळाहो ॥

नाचे उडे आणि पडे रडे हो । प्रत्यक्ष हा देव न सांपडेहो ॥८६॥

अपार माया तमवोसराया । शोकार्णवी या बरवे तराया ॥

निरंजना सौख्य घनावराया । दयाकरी देशिक देवराया ॥८७॥

अनाथ नाथा करुणा करारे । झालासि आता निज सोयरा रे ॥

यालागि मोठा मज लाभ झाला । पोटासी माझ्या समराम आला ॥८८॥

अहं रावणालागि ग्रासावयाला । सुवेळेसि तो सद्गुरु राम आला ॥

सवेते कपी श्रूरबोध स्वरुपी । विराजे मधे श्रूप त्रैलोक्या रुपी ॥८९॥

आत्मतत्व कळल्या जरि पाही । पुण्य पाप सहसा मग नाहीं ॥

बंध मोक्ष रविचे जळ झाले । पूर्ण बोधगति हे कवि बोले ॥२९०॥

आराधिती साधक ज्या स्वरुपा । जे नातळे कल्पित नामरुपा ॥

त्या चित्सुखे जे रमती स्वभावे । त्याची पदें तू धरि ऐक्यभावे ॥२९१॥

अभेदेचि जो नित्य पाहे जगासी । नसे विश्वमूळी असा भाव ज्यासी ॥

स्वयं बोध तो सद्गुरु सौख्यराशी । पदी त्याचिया मी सदा क्षेत्रवासी ॥२९२॥

अगुण सगुण दोन्ही राहिले भाव जेथे । सहज अमळ योगी सर्वदा मग्न तेथे ॥

परम विमळभावे तू करीभक्ति याची । अघटित परि लाभे भक्ति सच्चित्सुखाची ॥२९३॥

आनंद लेणे मज लेवविले । जिताची जेणे परतत्व केले ॥

त्या दातया लागुनि काय वानू । आत्मसखा केवळ बोध भानू ॥९४॥

अहेतु की जो अद्वयानंद भोगी । गुणातीत तो वेद विख्यात योगी ॥

तपस्वी तयाकारणे बोध झाला । सुखालागि त्याच्या पदि गांठी घाला ॥९५॥

अत्यंत हा पावन चित्त पक्षीं । आरुढला वाक्य विचार वृक्षीं ॥

सेवी सदा सार मया फळाते । झाले निके अमृत पान त्याते ॥९६॥

अत्यादरे बोधरता पाहे । तो सर्वदा सर्व गतीच राहे ॥

नाहीं तया अन्य कथा मनी हो । सेवी निजानंद निधी जनीहो ॥९७॥

असार संसार करुनि रक्षा । अपार हा केवळ रामलक्षा ॥

भक्षामृषा द्वैत भयासि आतां । नाचो नका देह धरुनि माथा ॥९८॥

आत्म तत्व हे सर्व जगासि आले । याकारणे सर्व भगास झाले ॥

हे जाणती काय ह्मणो तयाला । वाखाणिता डोल सुखासि आला ॥९९॥

आचाट हे नामक चाट नाशी । सपाट झाले जग सर्व त्यासी ॥

समान तो सम्य पदीं असे हो । भाग्यो दयो पुण्य शिळा दिसेहो ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP