केशवस्वामी - श्लोक संग्रह ८

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

क्षणा क्षणा सद्गुरु भेटि देतो । ह्मणोनिया सं सुखडोल येतो ॥

होतो मनी पूर्ण प्रकाश पाही । तया प्रकाशी जग सर्व नाहीं ॥३५१॥

डोळा दिसे राघव ते असे हो । हाती धरी तेचि हरी दिसे हो ॥

जे आइके तेचि मुकुंद झाला । मी आवरु केवि सुखार्णवाला ॥५२॥

हरि कथा श्रवणी मन लागे । हरि पदीं स्थिर हो उनि जागे ॥

तरि कदा न घडे भव बाधा । श्रुति शने करीती अनु वादा ॥५३॥

हरि कथा जिवनी मन व्हाले । निज सखा हरि सेवुनि धाले ॥

हरि पदीं बरवे रत झाले । हरि परा हरि वैभव आले ॥५४॥

हरि कथा श्रवणी बरवे टपा । जप तपा परता हरि हा जपा ॥

मग लापा हरिच्या चरणी बरे । टपाटपा तरिहा भव वोसरे ॥५५॥

हरि कथा श्रवणी स्थिर झाला । हरि पदा प्रति गर्जत आला ॥

हरि निरंतरी अंतरि आला । हरि दिसे जनकानन त्याला ॥५६॥

हरि कथा करिता हरि आहे । मज असे बरवे दिसताहे ॥

ह्मणवुनी हरि ह्मणे सरलेसे । न करणे सहजे उरलेसे ॥५७॥

हरिपदीं मति देवुनि जागीं । कवळिले हृदयी हरिलागी ॥

ह्मणवुनि श्रमही सर्वगेला । निजसुखे कविने सण केला ॥५८॥

हृदय कमळ वोले प्रेम देवूनि केले । चरण कमळ त्याचे चिंतिता दुःख गेले ॥

ह्मणवुनि मन माझे पावले सौख्य जाणा । कवि ह्मणे जगदात्मा देखिला रामराणा ॥५९॥

परम निर्मळ दीपक लावा । हृदयपंकज भास कदावा ॥

सकळ मंगळ होईल तेणे । मग कदा न घडे तनु घेणे ॥३६०॥

विलोकिता सर्वगता सिरासी । संसार झाला सम सर्वराशी ॥

गेल्या क्रिया सर्व सुखे लयासी । बोले कवी आत्मविवाह वासी ॥३६१॥

मायामया द्वैत भयासि सोडी । सच्चिन्मया सर्व गतासि जोडी ॥

जोडी नसे अन्य जनी तयाची । झाला सुखेमूर्ति निरामयाची ॥६२॥

गुरुचिंतनी वेधली वृत्ति बाळा । गळा रुळती निर्मळा मुक्तमाळा ॥

निके लेइले शांति लेणे त्रिकाळी । झळाळी चिदानंद कुंकू कपाळी ॥६३॥

आत्माचि मी हा सुविचार केला । याकारणे सर्व विकार गेला ॥

झालो सुखी पूर्ण पदी निवालो । विचारितां केवळ तोचि झालो ॥६४॥

दया कराने कर लाविला रे । निजाक्षरी शंकर दाविला रे ॥

यालागि चिंता ममता विराली । परावराची मग प्राप्ति झाली ॥६५॥

जो अन्यथा कर्म विधान नेणे । निदान मी हेची निदान जाणे ॥

उदानतो आत्म वदान्य पाही । लोकत्रयीं त्याहुनि मान्य नाहीं ॥६६॥

जे नेणती हाजन भाग कांहीं । त्याच्या मते हा भवनाग नांहीं ॥

सांडूनिया मार्ग गुणाचा । करी मना लाग सदा तयाचा ॥६७॥

नव्हेति जे चंचल मालवेगे । नवा गतीने नरमार वेगे ॥

देवूनी देवूनी भावे मळमाळ त्यासी । झाला कवी चिन्मय माळवासी ॥६८॥

प्रकाशिले जे गुरुभक्ति देही । प्रकाशिले श्रुतिच्या प्रवाही ॥

प्रकाशिले जे समसर्वठायीं । ते सूख माजे मज माजि पाही ॥६९॥

जो सर्वदा चिन्मय तीर्थवासी । काशी गया सर्वहि त्याचि पाशी ॥

वैकुंठवाशी भजती तयासी । त्यावेगळी अन्य पदे विनाशी ॥३७०॥

साधू जनासी मन देवुनी रे । आलो सभेसी हार लेवुनी रे ॥

आता हसे मी हरि लेउनी रे । गुह्यार्थ ऐसा वदती मुनी रे ॥३७१॥

साधू पदीचित्त सदा उगाळा । निराभिमाने तनुभाव गाळा ॥

घाला गळा आत्म प्रकाश माळा । तेणे करीना भव हा उमाळा ॥७२॥

विलोकिता मंगळ मूर्तिरामा । हे पावले चित्त समाधि धामा ॥

गेले लया सर्व विकार तेणे । याकारने द्वैत कथाचि नेणे ॥७३॥

साधू पदा वाचूनि अन्य कोठे । विलोकिता क्षेत्र नसेचि मोठे ॥

पिके निजानंद तरु पदी तो । सांडू नको संग मना कधी तो ॥७४॥

आले जरी सज्जन देहगावा । घेती तरी ब्रह्म पदी विसावा ॥

या कारणे चित्सुख सार लोकी । केलें तया मानव सर्व लोकीं ॥७५॥

सदा अच्युतानंत चित्तीच बोधे । जगी अक्षयानंद होऊनि नांदे ॥

न बाधी कदा त्यासि माया उपाधी । उपाधीक तो सर्व झाला समाधी ॥७६॥

मनी सद्गुरु नाथ पदाब्ज वाहे । जनी येकला राम संपूर्ण पाहे ॥

सुखा सारिखा नित्य होऊनि राहे । उभारुनि बाहे श्रुती गर्जता हे ॥७७॥

विसर्गीच तो नांदता सर्ग भोगी । श्रुती संमते तोचि नैष्कर्म्य योगी ॥

अती मुक्तता पावला तृप्त झाला । सदा अद्वयानंद ग्रामासि आला ॥७८॥

गर्जे सदा राघव राम वाचे । सत्कीर्तनी भेद त्यजुनि नाचे ॥

त्याच्या घरीं शेवक मोक्ष आला । तो भेटता राम घरासि आला ॥७९॥

काळासि जो भस्म करुनि टाकी । सूर्यादिका आत्म प्रभेसि झाकी ॥

तो अंतरी राम हिरण्य रेता । म्या जिंकीला संत दयाळ होता ॥३८०॥

वाणीस ही पूर्ण करुनि वाणी । जे सेविती आत्म प्रकाश खाणी ॥

समर्थ ते संतवि शोक पाणी । त्याची करी चित्त सदा शिराणी ॥८१॥

विश्रांति जे पूर्ण शुकादिकाची । जे मावुली मुख्य चतुर्मुखाची ॥

हरी हरा वंद्य विभूति ज्याची । मि लाधलो पूर्ण दया तयाची ॥८२॥

आचाट हे कर्म कचाट वारी । उदास तो दास अनंत तारी ॥

दयाळ तो राम सुखे ह्मणारे । शुकादि कामा जि सुखे गणारे ॥८३॥

संसार जंजाळ विचित्र कारी । तात्काळ गोपाळ चरित्र वारी ॥

या कारणें संतजनी पवित्री । संरक्षिले निर्मळ वत्कु पात्री ॥८४॥

दयार्णवें कौतुक युग्म केलें । हाती हरी देवुनि दुरि नेले ॥

केले मला राघव रुप साचें । विचित्र हो लाघव माधवाचे ॥८५॥

अंतवंत कळले जग ज्यासी । सर्व संत ह्मणिती शिव त्यासी ॥

मोक्ष पंथ वचनी प्रगटीतो । भाग्यवंत पहावा नयनी तो ॥८६॥

वैशाख मासीच निराभ्र काळी । जैसा दिसें निर्मळ वेश माळी ॥

तैसा सदा चिन्मय राणा । लक्षी मनी तोचि महेश जाणा ॥८७॥

पुत्रत्व टाकूनि पिताचि झाला । कळत्र मातेसि करुनि ठेला ॥

त्या कर्म भ्रष्टासि कसें भजावे । भजेल तेणेंचि तसेच व्हावे ॥८८॥

हृत्पंकजी ठेवुनि साधकाला । माता पिता पूर्ण स्वयेचि झाला ॥

तो सद्गुरु भेटता नित्य झाला । भेटेचिना देह असोनि त्याला ॥८९॥

अमळ केवळ चिद्‌घन पाहतो । मति विना पदि स्थीर राहतो ॥

नर नव्हे नर ईश्वर तो सये । किती वदो वदतां महिमा नये ॥३९०॥

सारुनिया वृत्त कळत्र वेगी । परंपरा निर्भय रुप भोगी ॥

महा सुखे भेद गळोनि गेले । तोम-रीवेद समर्थ बोले ॥९१॥

दया सागराची कृपा ज्यास झाली । स्वबोधेचि ते वृत्ति ज्याची निमाली ॥

पुढें बोलणें चालणेही निमाले । कृपासागरे थोर कौतुक केलें ॥९२॥

संत पाद कमळाप्रति सेवा । वोध चंद हृदया प्रति ठेवा ॥

द्वैत ताप तरि सत्वर नासे । मायबाप हरि सर्वहि भासे ॥९३॥

श्रुति मुखे क्षेत्र लयासि नेले । न क्षेत्र बोधी मन शून्य केलें ॥

विश्राम झालो मग मी शिवाचा । प्रसाद हा पूर्ण दयाधवाचा ॥९४॥

अमा पूर्णिमा ज्यासि झाल्यास मारे । न मातो तुह्मीं सद्गुरु चंद्रमारे ॥

क्षमा चिद्रमा वश्य होतील तेणे । घडेना कदा द्वैत सद्मासि येणे ॥९५॥

सुखात्मा गुरु सच्चिदानंद मूर्ती । तयाच्या पदी रंगली चित्त वृत्ती ॥

ह्मणोनी लया दीर्घ संसार गेला । सदा वास संपूर्ण पोटीच केला ॥९६॥

संत संग धरिता गुणवंता । भस्म होय अवघी भवचिंता ॥

द्वैतभान सगळे मग मोडे । नित्य मुक्त हरिचे पद जोडे ॥९७॥

प्रकाशला राघव सर्व ठायीं । ठेवावया पाउल ठाव नाहीं ॥

या लागि मी राम पदीच नांदे । बोले कवी बोध रवी प्रसादे ॥९८॥

विशाळ रुपी परि चांगले हो । तेश्रूत अह्मा प्रतिलाग लेहो ॥

त्याचे पदी हे मनरंग ले हो । तेणे भवाचे भयभंग लेहो ॥९९॥

पंचाक्षरी तो गुरुदेवराणा । झाडी स्वये पंचभुतासि जाणा ॥

ठेवूनिया तारक हातमाथा । हा काढिला पूर्ण समाधि आता ॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP