साधू पदे परम निष्फळ भक्ति रंगे । वंदुनिया स्वपद लोपक शोकभंगे ॥
जे डुल्लती अचळ अद्वय प्रीति योगें । ते मी सखे करीन संत सभोग्य भोगे ॥४५१॥
निजहित करणानें नाशिलें कारणासी । सकळ काणपात्रीं बांधिलें चित्सुखासी ॥
ह्मणवुनि करणें हे पावली शांति जाणा । करणीयविण डोळा देखीला रामराणा ॥५२॥
दाऊनी रामकरणी करणासि मारी । मारुनि भेदजनना मरणा निवारी ॥
संपूर्ण आज मजला स्वपदीच थारा । त्यावीण सर्व लटिकें बरवे विचारा ॥५३॥
कवळुनि हरिचिद्घन सांवळा । उडविला मनकश्मलकावळा ॥
ह्मणउनी अति पावन मी जनीं । निजपदीं दिधलें स्थळ सज्जनीं ॥५४॥
कंठास कंठ मिळुनी क्षण एक झाला । आनंदता उभयता सकळे जनाला ॥
तो सांग तारव नये धरणी धराला । तो केवि हा वदवतो मज मानवाला ॥५५॥
गुरुपद रजमानथा वंदिलें पूर्ण जेणें । क्षण लव पळ होता होइजे ब्रह्मतेणें ॥
भवभय विषयाचा शब्द तेथे न साहे । सहजचि मग तेथें श्री सदानंद राहे ॥५६॥
चिन्मात्र बोधें परिपूर्ण व्हावें । माझ्य मुखे म्या जम विसरावे ॥
ऐसे मनी आर्थ अपार होते । ते पूर्ण केले अवघे अनंते ॥५७॥
सर्वात्मातो अंतरी राम पाहू । चिष्कामाचे धाम होवूनि राहू ॥
ऐशी अह्मा लाधली प्राप्ति पाहीं । गेली माया देह झालेचि नाहीं ॥५८॥
भूती भूत नातासि पाहोनि डोळा । भूताचि पदें वंदिती वेळोवेळा ॥
श्रुती वंततो ते श्रुतातीत होती । महद्भूत ऐसे श्रुती त्यासि गाती ॥५९॥
सदा सच्चिदानंद डोही बुडाला । स्वबोधे नसे नाम रुपासि आला॥
जगत्पावन देह कर्मे तयाची । मुखे वर्णिता प्राप्ति सच्चित्सुखाची ॥४६०॥
कळेना तपे जे व्रते आकळेना । परातीत पै साधनीवी वळेना ॥
महद्रूप ते दाविले पूर्णमाते । कसे वीसरावे तया सज्जनाते ॥४६१॥
अज्ञान काळी भव सत्य नाहीं । विज्ञान काळी भव सत्य नाहीं ॥
अखंड ऐसा भव सत्य नाहीं । हा साधुचा केवळ बोध पाहीं ॥६२॥
यथार्थ हा माइक बोध पाहीं । यथार्थ हा मोक्ष कदापि नाहीं ॥
यथार्थ हा केवळ बोदह ज्यासी । यथार्थ हा मोक्ष अखंड त्यासी ॥६३॥
त्रिकाळ जो ज्ञान जळी बुडाला । त्रिकाळ तो आत्म कळे निवाला ॥
त्रिकाळ जो केवळ ब्रह्म झाला । त्रिकाळ नाहीं भव सत्य त्याला ॥६४॥
साधूविना आणिक देव नाहीं । सिद्धांतिचा निर्णय हाचि पाहीं ॥
यथार्थ ते केवळ बोधराशी । त्याची पदे वांछिति स्वर्ववासी ॥६५॥
स्वये आपले सौख्य जो पूर्ण घेतो । स्वये आपले सौख्य जो पूर्ण होतो ॥
स्वये आपले सौख्य सर्वासि देतो । मला भासतो देव आंगे चिरेतो ॥६६॥
मोहो जयाला उरला असेना । देहो जयाला उरला असेना ॥
संदेह झाला उतरला असेना । दिसे तरी तो उरला असेना ॥६७॥
जिवा शिवा जेथ निरास झाला । हा बोध ज्याच्या हृदयासि आला ॥
त्याहूनि बापा तव थोर नाहीं । असे तसा तो निजरुप पाहीं ॥६८॥
असा दत्त तो नित्य निर्धूत पाहीं । जयाना मना रुप कांहींच नाहीं ॥
असंगी सदा सर्वसंगी निसंगी । महाराज तो पूर्ण निर्वाण योगी ॥६९॥
सखा दत्त तो स्वामि तो ब्रह्मचारी । जगी नांद तो नातळे बूद्धि नारी ॥
अवीकारतो नित्यसाकार झाला । दिसे तोतरी नाहि आकार त्याला ॥४७०॥
घटा भंग झाला मठी भंग झाला । तही सर्वदा भंग नाहीं नभाला ॥
असे जाणती रुप जीवेश्वराचे । तनू नासल्या काय नासेल त्याचे ॥४७१॥
तनू भासता भास मिथ्या तनूचा । तनू नासता नाश मिथ्या तनूचा ॥
असा निर्णयो बाणला ज्या तनूचा । स्वये तो मनू विन्मनू त्या मनूचा ॥७२॥
स्वये शुद्ध तोरे स्वये बुद्ध तोरे । महासिद्ध सिद्धाहुनि सिद्ध तोरे ॥
निजानंद योगे निजानंद तोरे । पदातीत भोगी सदा नंदजोरे ॥७३॥
पदी मग्न होउनिया पूर्ण साचे । करी सर्वदा रुप जोरे पदाचे ॥
महाशुद्ध तो शुद्ध तो पूर्ण पाहीं । तया सारिखा बुद्धकोणीच नाहीं ॥७४॥
गुरु लक्षिती भक्षिती देहभावा । सदा साधिती दुर्गतीच्या स्वभावा ॥
मनाती तजे भोगिती स्वात्मभावा । विरे वानिता चित्त त्याच्या स्वभावा ॥७५॥
भावे बुडालो गुरुच्या कुळी जो । बोधे निमालो स्थितिच्या मुळी जो ॥
जिताचि मेला निज निष्फळी तो । निर्वाणयोगी गुरुमंडली तो ॥७६॥
गुरुअद्वयानंद जाणोनि याहो । सदा मूकले भेद संगासि याहो ॥
नसे सद्गुरुवीण ज्या रिक्त ठावो । मते माझिया तो गुरुमुख्य पाहो ॥७७॥
पंचांग हे कल्पित ज्यासि झाले । दशांग त्याचे सहजे निमाले ॥
त्रयांगहे त्यासि समूळ नाहीं । विनांगते वर्तति मुक्त पाही ॥७८॥
निष्कामता पूर्ण जयासि ओळे । ज्याचे जिवी बोध अखंड खेळे ॥
साधू कुळी तो निजभानु पाही । त्यावेगळा ज्यानकि नाथ नाहीं ॥७९॥
सांडूनि माया गुणवैभवाते । जे छेदिती पूर्ण भवोद्भवाते ॥
आराधिती शास्त्र मुखेंभवाते । ते नेणती याभव संभवाते ॥४८०॥
निजानंद जो पूर्ण विज्ञान डोही । जया डोहिचा अन्यथा भास देही ॥
तया डोहि द्या जीव कल्पीत वासी । असें जाणती ते निजानंद राशी ॥४८१॥
मनातीत जो नातळे का मनारे । मनातीत त्याला नुरे कल्पनारे ॥
मनातीत तो मीनला चिद्घनारे । मनातीत जो पूर्ण योगी मनारे ॥८२॥
मनातीत योगी करीतेचि कर्म । मनातीत योगी करीतोचि धर्म ॥
मनातीत ज्याचे अतीगुह्य वर्म । मनातीत तोरे स्वये पूर्णब्रह्म ॥८३॥
नमस्कारहा नित्य त्यातें करावा । अती आदरे संग त्याचा धरावा ॥
जया मानसी श्रीहरी क्षेत्रवासी । भजावेत या सर्वदा योगियासी ॥८४॥
करुनि तो कर्म नव्हेचि कर्मी । अकर्म योगिचि नव्हे अकर्मी ॥
स्वयेमहत्सौख्य समुद्र झाला । श्रुती ह्मणे आत्म पदासि आला ॥८५॥
क्षरीचिया अक्षर पूर्णपाहे । तो अक्षराचे निजसौख्य लाहे ॥
यथार्थ पै अक्षर तोचि आहे । क्षराक्षरातीत निवांत राहे ॥८६॥
शब्दासवे मौन्य कदा न मोडे । विलोकिता भेद समस्त मोडे ॥
ऐसी दया पूर्ण जयासि जोडे । आत्माचि तो नेणति लोक वेडे ॥८७॥
दरिद्रे जर्ही व्यापिले योगि यासी । तरी नाठवे दैन्य वार्ता तयासी ॥
सुखात्मा हरी अंतरी जोडलासे । सुषुप्तापरी दृश्य त्याते नभासे ॥८८॥
सत्संगती पूर्ण फळासि आली । त्दृत्पंकजी शांति दया रिघाली ॥
परोपरी भेद दशा निमाली । सच्चित्सुखाचि द्धन प्राप्ति झाली ॥८९॥
सत्संगति आत्मसुखासि घेती । तेणे सुखे पूर्ण निवांत होती ॥
क्षमा दया त्यासि कळेच नाकी । त्याची दशा सर्व शेवि पिनाकी ॥४९०॥
संसाराचे भान बोधी बुडाले । गेली माया चित्त चिन्मात्र झाले ॥
ऐसे केले सद्गुरु आदि नाथे । जेथे तेथे भेटतो मीच माते ॥४९१॥
संकल्पाची मूळ माया निमाली । संसाराची शांति तत्काळ झाली ॥
गेला मोहो देह स्वामी दिसेना । ब्रह्मानंदी भेद वार्ता असेना ॥९२॥
सत्संगति शांति कपाट सेवा । त्दृत्पंकी वेदन दीप ठेवा ॥
तेणे गुणे सर्व असार साधे । अप्राप्त हा मंगळ मोक्ष लाधे ॥९३॥
सोडूनिया गर्व अगर्व भावा । सर्वत्र हा सर्व सखा करावा ॥
तेणे गुणे सर्व अभाव भावे । अव्यक्त चिन्मात्र मनी ठसावे ॥९४॥
सांडूनिया काम क्रियेसि पाणी । स्मरा तुझी चिन्मय चक्रपाणी ॥
पाणी चढे बोध निधीस तेणे । नेदी उरो मीपण पूर्ण तेणे ॥९५॥
सत्संगति शास्त्र विचार द्वारा । येवूनिया सत्व समुद्र पारा ॥
सेवी सखा चिन्मय शेष शायी । तो आमुचा केवळ सांप्रदायी ॥९६॥
साधू दया होय जयासि पाहीं । संसार वार्ताचि तयासि नाहीं ॥
पावे सदा सर्वगता अभेदा । नेणे कदा मोह भदाव रोधा ॥९७॥
सेवी निजानंद घन त्रिकाळी । पडेचिना घोर विकार जाळी ॥
जाळी तयाच्या भजनेत्रि तापा । क्षरीचया अक्षर होय बापा ॥९८॥
सुख घना अमना हरिनागरा । निज मनी धरुनि भवसागरा ॥
यतिवरी अमरी तरी जे खरे । गुज असे कथिले करुणाकरे ॥९९॥
सन्मात्र काशी घडली जयासी । संसार नाहीं उरला तयासी ॥
आनंद राशी परि पूर्ण झाले । तारावया ते मजलागि आले ॥५००॥