संकल्प वैरी बरवा निमाला । प्रपंच गैरी परताचि झाला ॥
झाला सदानंद अपार पाही । न बोलवे तो निजलाभ कांहीं ॥५०१॥
संसार जाळी भजनेचि जाळी । तो वंदिता चिन्मय अंशजाळी ॥
काळी कराळी रजनी निमाली । निजाक्षराची मज भेट झाली ॥२॥
स्वरुपीच जे राहिले सर्व भावे । तया ते कसे धारी ह्मणावे ॥
स्वइच्छा जरी वर्तती सर्व लोकी । तरी ते निजानंद ऐसे विलोकी ॥३॥
सखा सद्गुरुनाथ भेटीस आला । महत्या तया सर्व शोकासि झाला ॥
निमाला भवी गेला दिग्गता । अनंतीमृषा आटली चित्त चिंता ॥५०४॥
सदा सत्पदी रंक होवूनि लागे । क्रियेमाजि जो कामना शुन्य वागे ॥
जनी सच्चिदानंद बोधेचि जागे । भवाचा कदा पंक त्याते नलागे ॥५॥
संसारशत्रू बरवा हराया । तात्काळ माया श्रम वोसराया ॥
समग्रया सर्व गता वराया । आलो तुझे पाय शिरी धराया ॥६॥
साधू जनाच्या मिळणी मिळावे । निष्काम बोधे बरवे फळावे ॥
भवार्णवासी अवघे गिळावे । चिन्मात्र वेगे सगळेचि व्हावे ॥७॥
सम सनातन मंडप केला । गति विना कवि वस्तीस गेला ॥
मति विना अति निश्चळ राहे । सुख घनात्मक सर्वहि पाहे ॥८॥
सित्धांत सारी करिती मिराशी । संसार हा सार दिसे तयासी ॥
संसार राशी मग तेचि पाही । तया वनाधार तयासि नाही ॥९॥
साधू दया सिंधु विवेक राशी । वंदूनिया केवळ निश्चयेसि ॥
आत्माहरी पूर्ण स्वयंप्रकाशी । केले सदा अद्वय लग्न त्यासी ॥५१०॥
संसार मस्ती अवघी झडाया । निवृत्तीसी लग्न बरे घडाया ॥
आलो सदा संत पदी पडाया । स्वानंद राशी शिव सापडाया ॥११॥
संकल्पाचे जाळ तात्काळ तोडी । संसाराचे जाळ निःशेष सोडी ॥
त्याची गोडी लागता वोढि गेली । नाही जोडी जोड त्याचीच केली ॥१२॥
शमा दमादिक साधन नाना । न करिता करिता गति जाणा ॥
सुख घने गुरुने दिधली हो । गति मृषा गतिने कळली हो ॥१३॥
साधू दया वैभव प्राप्त झाले । त्दृत्यंकजा केवळ ब्रह्म आले ॥
धाले निवाले मन ऐक्य योगे । गेले लया पंचक जाळ वेगे ॥१४॥
साधू दया तेज प्रकाशले रे । संसार दुःखा लया नास लेरे ॥
स्वानंद पाने बरवा निवालो । जेणे कळे सर्व हितेचि झालो ॥१५॥
शुके घातली जे फळी झेप वेगे । तया सत्काळ लागि विज्ञान योगे ॥
करी देवुनी भक्षवी बाप माझा । असे देह तो आठवू त्यासि वोझा ॥१६॥
सदा लग्न वेदांत शास्त्री चलावी । जगा माजि या मग्न रामासि दावी ॥
निजि मग्न तो लक्षिता भग्न माया । मने सेवुनी पाव निर्विघ्न ठाया ॥१७॥
साधू संगे मानसी राम दाटे । माया सिंधू सर्व तात्काळ आटे ॥
जेथे तेथे अच्युतानंत भेठे । ब्रह्मानंदे सर्वदा पूर लोटे ॥१८॥
साधू संगे सर्व दासानु रागे । आह्मी रामी रंगलो द्वैत त्यागे ॥
आता आह्मा आणि रामास कांहीं । नाहीं नाही सर्वथा भेद नाही ॥१९॥
सोडूनिया सर्व वीचारणारे । धरी मनी अद्वय धारणारे ॥
होशील तू कारण कारणाचे । या कारणे अन्य पथीन नाचें ॥५२०॥
साधू मुखे कर्म सपाट केले । अपार हे द्वैत कपाट गेले ॥
झाले मनी सौख्य आचाट मोठे । फुटेचि ना वाट गती कोठे ॥५२१॥
सांगूनिया मंगलरुप गोष्टी । दावी सखा मंगळ राम दृष्टी ॥
करी सदा मंगळ सर्व पाही । या वेगळे मंगळ अन्य नाहीं ॥२२॥
श्रुति मुखें हरि हा परवाचा । मूर्ख लोक ह्मणती परवाचा ॥
याचि लागि पडती भव ओळी । शीघ्र त्यासि दुरि नेउनि जाळी ॥२३॥
श्रुती सम्मते कल्पनेच्या लई हो । करी वास जो नित्य सच्चिन्मयी हो ॥
क्रियाचा सनिःशेष ज्याचे गळाले । घनानंद हे विश्व संपूर्ण झाले ॥२४॥
श्रुति मुखें हरुनि श्रम कारणा । जरि मना धरिसी निज धारणा ॥
तरी त्वरे तरिसी भवसागरी । निजसुखें निवसी त्दृश्यांबरी ॥२५॥
शिवगुणे जडली मति बाळिका । ह्मणवुनी सरली भव काळिका ॥
शिवचराचर सर्वहि भासले । शिव सुखे मतिचे भय नासले ॥५२६॥
सुखाची बरी खाणी हातासि आली । ह्मणोनि बहू वाणि वाणीस झाली ॥
मृषा हालणे चालणे सर्व झाले । पदी बैसता डोलणेही निमाले ॥२७॥
श्रुति परात्परता अमलोदये । भगगिरी खचला मतिचा लये ॥
निजसुखे खचला बरवा कवी । कवि नव्हे मग तो रविचा रवी ॥२८॥
सन्मात्र आहे जन सर्व पाही । या वेगळा निर्णय अन्य नाहीं ॥
जे जाणता नेविव शुन्य झाली । हे जाणता जाणिवही निमाली ॥२९॥
स्वराज्य होता प्रति पूर्ण आले । सायोज्य भद्रासन प्राप्त झाले ॥
विश्रांतीचे छत्र अखंड माथा । झाला जगी आत्मप्रकाश आता ॥५३०॥
साधूपदी चित्त बळेचि नाहो । त्रैलोक्य चिन्मात्र बळेचि नाहो ॥
यालागी स्वानंद फळेचि नाहो । ऐसे सदा गर्जति शांति नाहो ॥५३१॥
सरे गोमती गोपती आठवीता । असे ठाउके वर्म झाले महंता ॥
ह्मणोनि सदा सेउनी गोपतीते । स्वबोधेतिही नासिले गोमतीते ॥३२॥
शिव रसाप्रति हा जिव घेता । जि वदसे परता तरि होता ॥
अति सुखें निवृता मग पाही । मति विना वसता निज ठायीं ॥३३॥
सोडूनिया सर्व क्रियाटणासी । मी पावलो चिन्मय पाटणासी ॥
यालागि मी आजि सभाग्य झालो । स्वराज्य पावोनि सुखे निमालो ॥३४॥
साधू पदी वास करुनि जागे । निरंजनी लाग तयासि लागे ॥
नेणेचि तो चित्र जगत्रयाचे । झाला घनानंद स्वरुप साचे ॥३५॥
सर्व देव कळिला जरि माये । व्यर्थ गर्व धरणे तरि काय ॥
मोक्ष पर्व वदना कवि ऐसे । दिव्यरुप रविमंडळ जैसे ॥३६॥
साधू कुळी तो खळवाट पाडी । त्या काम चोरासी बळेचि ताडी ॥
मायामयी पाझर सर्व झाडी । दयानिधी अमृत ताट वाढी ॥३७॥
शिवजळी रमता मनमच्छा । विसरलो विविधा भव इच्छा ॥
क्षणभरी न वचे तरि कोठे । मग ह्मणे बहुरे सुख मोठे ॥३८॥
स्थळ जसे मिरवे स्थळ संगे । जळ जसे भरले जळ रंगे ॥
शिवसा विलसे शिवयोगे । गुज असे वदवी श्रुति वेगे ॥३९॥
सोडोनि गोडी भव वैभवाची । करी बरी भक्ति दयार्णवाची ॥
तो नातळे सर्व क्रिया प्रमाणा । गेला गुणातीत पदासि जाणा ॥५४०॥
सुखमया सखया गुरुराजया । निजदया करुनी हरिशी भया ॥
ह्मणवुनी वदती श्रुति पक्षिणी । समपदा मिळणी तव ईक्षणी ॥५४१॥
श्रम हरा भव तारक देवा । निशि दिवा करिता तव सेवा ॥
मम करा निज वंदन आले । निजसुखें मन पांगुळ झाले ॥४२॥
संसार सिंधू तरणार्थ पाही । मी लागलो सद्गुरुनाथ पायीं ॥
तात्काळ तेणें भवदुःख गेले । तीर्थे मला चिन्मय तीर्थ केले ॥४३॥
सत्संगती प्रेमसुखें निवालो । यालागि मी उत्तम श्र्लोक झालो ॥
गाती जया वेद श्रुती पुराणे । ते ब्रह्म मी केवळ हेचि जाणे ॥४४॥
सत्संगमी या बरवा निवालो । यालागि मी पूर्ण पदासि आलो ॥
झालो स्वता चित्सुखा तत्वता हो । नये कथाते मज सांगता हो ॥४५॥
दया सद्गुरु स्वामिनें पूर्ण केली । मृषा कल्पना नाशिली भ्रांती गेली ॥
अती पक्वता पावली वृत्ती धाली । अवाधीत हे केशवी प्राप्ति झाली ॥४६॥
दयानिधी राघव प्रेम तोषे । नांदे जनी केवळ संत वेषे ॥
तरी जना लागुनी आर्त नाहीं । ठेवीच ना चित्त निवांत पाई ॥४७॥
दिवा आणि रात्री निजात्माचि नेत्री । स्वबोधे सदा लक्षिती सर्वगात्री ॥
सुमित्री तया श्रूतमात्री घडे हो । अभेदे चिदानंद हाता चढे हो ॥४८॥
सुखसिंधूच्या पोटा आलो । आह्मी चित्सुख चंद्र झालो ॥
माझे अंग मज गोड वाटे । सेवी तव आनंद दाटे ॥४९॥
मजपासूनि झाला बोध । तोहि स्वानंद रुपसिद्ध ॥
अंगग्रासूनि अनंग झालो । ह्मणे केशव अंगीच धालो ॥५५०॥