निरंजन माधव - श्रीमहालक्ष्मीस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


निरीक्षिले म्यां बहुदेव, माये ! । ते वंदिती सर्व तुझेचि पाये ॥

सत्कीर्ति तुझी भुवनांत गाजे, । विष्णुप्रिये ! सुंदरी लोकपूज्ये ॥१॥

वाणी स्तवों काय सकेल तुला ? । उदार तुझी गुणरत्नमाला ॥

जे शोभवीती निजकंठदेशीं । ते शोभती सर्व जगीं विलासी ॥२॥

त्यांच्या घरीं सुंदरत्नशाला । स्थूणामणींच्या रचिता विशाला ॥

गजाश्च धेनू धन दासदासी । देशील तुझ्या करितां जपासी ॥३॥

माला गळां शोभति त्याजला गे । जो दास तुझ्या चरणासि लागे ॥

तन्मंदिरीं सर्वसुखा दिवाळी । महाकृपें वर्तत नित्यकाळीं ॥४॥

हंसी तशी सोज्वळ कीर्ति त्याची । विराजते केवळमानवाची ॥

तुझें महाद्वर धरोनि राहे । महत्तमे मुर्ति तुझीच पाहे ॥५॥

तयासि ते बाधिल विष्णुमाया । होयीचना; जे भजताति पायां ॥

तरोनि जाती भवसागरातें । कटाक्षमात्रें भगवत्पदातें ॥६॥

तयांसि लाभे अतिरुप जाया । विमुक्तिनाम्नी अकलंककाया ॥

विद्याच तूं त्यांप्रति मोक्षधामीं । आनंदधात्री घडतेसि लक्ष्मी ॥७॥

यथार्थ तूं क्षीरसमुद्रबाळा । प्रसिद्ध तुझी जगतींत लीळा ॥

नरासि देशी अमरत्व आयी । येथें म्हणो ये नवलाव कायी ? ॥८॥

आर्द्रा तुझी दृष्टि, सती ! विराजे । सुधा तिला देखुनि फार लाजे ॥

जरामृती वारुनि भाविकांच्या । मोक्षासे देसी असले ! त्रिवाचा ॥९॥

स्वभक्तिमंता घडसील भद्रा । नोहे तुझी प्राप्ति तया अभद्रा ॥

म्हणोनि घ्याती तव पादपद्मा । पद्मालया केवळ सौख्यसद्मा ॥१०॥

सरोज नेत्रे शतपत्रपाणी । प्रेमामृतें जीवविं विश्वखाणीं ॥

वाखाणिती वेदपुराण लीला । जिणे तुझा दास बळें कळीला ॥११॥

रामा अनंता असती सुरांच्या । न पावती त्वन्महिमेसि साच्या ॥

त्या किंकरी होउनि पाय तुझे । समचिंतां सौख्य तयां विराजे ॥१२॥

ऋद्धी घरीं होऊनि सर्व दासी । पद्मोद्भवे । सेविति त्या पदासी ॥

तुझ्या पदाब्जीं रतले तयांतें । प्रसन्न होती, हरिसी भयातें ॥१३॥

उदार ते पावति शुद्धबुद्धी । हरिप्रिये ! पावति सर्व सिद्धी ॥

त्वत्पादपंकेरुहभक्ति ज्यातें । धन्यच ये त्याचि महाकुळातें ॥१४॥

चौदापरीच्या उपजाति वृत्तें । संप्रार्थिलें म्यां हरिवल्लभेते ॥

ईशादि साम्राज्यपदीं उपेक्षा । मानुनि तुझी धरिली अपेक्षा ॥१५॥

उपेद्रराणी मकलार्थ खाणी, । दयार्णवा फुल्लसरोजपाणी ॥

प्रसन्न होते जरि सुस्तवासी । पढोनि भक्तोत्तम तो उपासी ॥१६॥

बनाजी कवी शीकवीसर्व लोकां । पढा सुस्तवा विष्णुपत्नी विलोक ॥

इहामुत्रसंपत्ति भोगा अनंता ; । मिळा मुक्त होऊनि शेखीं अनंता ॥१७॥

॥ इतिश्रीनिरंजनमाधवयोगिविरचित्तं लक्ष्मीस्तोत्रम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP