Dictionaries | References अ अस्मान Script: Devanagari Meaning Related Words अस्मान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The sky or heavens. अस्मान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The sky, heavens.अस्मान ठेंगणें होणें To be puffed up with pride.अस्मानी a Sky-coloured; heavenly.अस्मानी सुलतानी Heavenly and regal visitations, calamities. अस्मान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आकाश अस्मान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. आकाश ; अंतराळ ; स्वर्ग . अस्मानीं फत्तेची ध्वजा लागली . - चित्रगुप्त ३३ . अस्मानहि बुडालें तरी ( मराठे ) आपल्या मर्दानगीस अंतर करणार नाहींत . - मरि ३ . ७१ .०गिरी पु. चांदवा ; छत ; चांदणी ; मांडवाचें आच्छादन ; मांडव ; छप्पर ; वळचण .०चपेटा पु. परमेश्वरी कोप ; मोठा प्रलय ; संकट ; दैवी आपत्ति ; अरिष्ट .( व्याजोक्ति ) आकाशांत उड्डाण करणारा घोडा ( एखाद्या रद्दी , टाकाऊ , निकामी घोड्यास म्हणतात ). - ची परी - स्त्री . अप्सरा ; सुंदर स्त्री . तबियतखानचें सर्व लक्ष्य हातीं लागलेल्या अस्मानच्या परीकडे होतें . - स्वप ४२९ .०तारा पु. आकाशांत चमकणारा तारा ; चांदणी .धूमकेतु ; उल्का . ( क्रि० तुटणें ).सुंदर , चपळ घोड्याबद्दल अगर खंद्या घोडेस्वाराविषयीं , तसेंच उत्तम गवई , उत्तम लेखक , उत्तम बजवय्या इत्यादिकांची प्रसंशा करतेसमयीं म्हणतात . अस्मान तारा तुटणें -उल्कापात होणें ; तारे निखळून पडणें .निरर्थक बडबड करणें . अस्मान जमीनीची तफावत - स्त्री . महदंतर ; फार मोठें अंतर . त्या सुमारास व या लिहिण्यास पाहतां अस्मान - जमीनीची तफावत . - ख १२१५ . अस्मान ठेंगणे होणें - स्वर्ग दोन बोटें उरणें ; ताठ्याचा - गर्वाचा कळस होणें . नवर्याच्या पगारामुळें तर तिला अगदीं अस्मान ठेंगणें झालें होतें . - पकोघे [ फा . आस्मान = आकाश ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP