|
बंधन ; बांधण्याची , आवळण्याची , बांधणारी वस्तु . नियंत्रण करणारी गोष्ट ; दोर ; बंद . जसें - केळीच्या पानांस बांधण्याचा सोपटाचा बंद ; गवताचा भारा बांधण्याची गवताची दोरी . हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं - तुगा २८०२ . ( ल . ) नियंत्रण ; बंधन ; संयमन ; दाब ; मर्यादा ; आडकाठी ; धरबंध . ( क्रि , घालणें ; तुटणें ). एकीचा धंदा दुसरी जात करणार नाहीं असा आळा पडला - गागा २६ . ( व . ) एकी ; जूट . कुणब्यांचा आळा . [ सं . आलान ( धातु ली )= सांखळी , बंधन , किंवा म . अळणें ] ०घालणें मर्यादा , नियम , बंधन घालणें ; आटोक्यांत ठेवणें ; व्यवस्था लावणें . घालील महाराष्ट्राला निरभिलाष आळा कोण - यापुढें । - विक ९ . ०पिळणें गाडीची आखरी आणि साटा यांना बांधणार्या आळ्याला आळेदांडीनें पीळ घालणें . आळ्यांत असणें , वागणें , राहणें , चालणें धाकांत , कह्यांत , ताब्यांत असणें . ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते . मराठी व्याकरणावरील निबंध ( कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत ) १० . आळ्यांत आणणें ताब्यांत , कह्यांत ठेवणें . नियमन करणें ; नियम व्यवस्था लावणें . जॉनसन यानें कोशरचना करुन तीस ( इंग्रजी भाषेस ) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्यानें शेवटास नेला . - नि ५५६ .
|