|
स्त्री. थाटानें पुष्कळशा जमावानें सावकाश जाणें ; छबीना ; दिंडी ; वरात ; स्वारी . ( क्रि० निघणें ). झाली संभ्रमे मिरवण । - वेसीस्व ७ . १०६ . [ का . मेरवणगे , मिरवणें ; का . म्यरोण ; द्राविडी . मेरे ; अरमीर , अमीर , मिहीर ] मिरवणी - स्त्री . अलंकार ; सुशोभित करण्याची वस्तु . पै जळशयना चिया अवगणिया । कां मत्स्यकूर्म इया मिरवणिया । - ज्ञा ११ . ८४ . प्रसिद्धि . सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । - अमृ १ . ५४ . मिरवणें - अक्रि . वाद्यादिसहित शहरांतून समारंभपूर्वक सावकाश जाणें ; भपका दाखवीत जाणें . छानछोकीनें फिरणें ; डौलानें जाणें . ( ल . ) धिंड काढली जाणें . शोभणें . तेंचि कृष्णाचें श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवत । - एरुस्व १ . ५४ . बोलणें . क्रीडा करणें ; खळणें . डौल दाखविणें ; डौलानें फिरणें . मिरवा मिरवणें - डौलानें दिमाख दाखवीत हिंडणें . मिरविणें - सक्रि . मिरवणूक काढणें ; थाटानें फिरवीत नेणें . प्रतिष्ठा , डौल , तेज , विद्या , गुण , ज्ञान , शहाणपण मिरविणें , मिरविणें - प्रतिष्ठा डौल इ० चें निरर्थक प्रदर्शन मांडणें ; पोकळ देखावा दाखविणें ; खोटा आविर्भाव करणें .
|