Dictionaries | References द दिंडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिंडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | v काढ, मिरव, & निघ, चाल, फिर. Rate this meaning Thank you! 👍 दिंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A wicket. A particular musical instrument. A picture or figure (as of हनुमान &c.) drawn and stuck upon a cloth which floats from a pole carried in processions. hence a procession (of an idol &c.) v काढ, मिरव, निघ, चाल, फिर. Rate this meaning Thank you! 👍 दिंडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. भजनी मेळा , मिरवणूक . Rate this meaning Thank you! 👍 दिंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा Ex. त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले. noun पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्यांचा समूह Ex. दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात. see : दिंड Rate this meaning Thank you! 👍 दिंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ मोठ्या दारस केलेली लहानशी झांप , दरवाजा . [ का . दिड्डि ] स्त्री. १ लहान तंबोरी ; एक वाद्य ; वीणा . हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । - तुगा ३४७ . २ मिरवणुकीमधील निशाणावर हनुमान इ० कांचे काढलेले चित्र , आकृति किंवा ते निशाण . ३ ( देव , ग्रंथी इ० ची ) मिरवणूक ; भजनी मेळा ; छबीना . ( क्रि० काढणे ; मिरविणे ; निघणे ; चालणे ; फिरणे ). ४ मराठी काव्यांतील एक वृत्त . [ का . दिड्डि ] - गाण - पु . १ दिंडी वाद्य वाजवून भीक्षा मागणारा . वासुदेव दिंडीगाण । प्रसाद मागूं आले जाण । - लळित . २ दिंडी या वाद्यावर म्हणावयाचे गाणे . - पताका - स्त्रीअव . १ वाद्य वगरे . २ यावरुन ( समुच्चयार्थी ) मूर्तीची मिरवणूक . ( मंडळी , पताका , दिंड्या , झांज मिळून ); पताका , मृदंग इ० घेऊन मूर्तीच्या अथवा देवळाच्या भोंवताली प्रदक्षिणा घालणार्या लोकांची मिरवणूक . ( क्रि० काढणे ; मिरविणे ; निघणे ; घालणे ; फिरणे ). दिंडीपताका बहुवस । विठ्ठल नामे होतसे घोष । - संवि ९ . १७ . [ दिंडी + पताका ]०दरवाजा पु. दिंडी असणारा मोठा दरवाजा . हा मोठ्या वाड्यांना असतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP